शेतकऱ्यांची वीज कापायला आल्यास ‘झटके’ देऊ, रघुनाथ पाटलांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतीचे वीज कनेक्शन तोडले गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत. एमएसईबीच्या याच धोरणाच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा निर्धार शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केला आहे. याबाबतची माहिती सोलापुरात देताना त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत वीजबिलाची अव्वाच्या सव्वा रक्कम भरायची कुणी ? असा सवाल उपस्थित केला आहे.

यावेळी बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांचे विजेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून वीज कनेक्शन तोडणे , डीपी बंद करणे , डांबाच्या फ्युजा काढून नेने हे प्रकार वारंवार घडत आहेत. एमएसईबीचे आम्ही देणे लागत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने वीज कनेक्शन तोड नका अशी ऑर्डर केलेली आहे. तरीही एमएससीईबीचा आगाऊपणा सुरू असून त्याविरोधात संघर्ष उभा करत आहोत अशी माहिती पाटील यांनी दिली.

मागच्या काही दिवसात कोरोना ,लॉकडाऊन , अतिवृष्टी ,वाकली पाऊस यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची बिजाबिले थकली आहेत. मात्र एमएससीबीने कनेक्शन कापणी केली आहे. मात्र आता वसुलीला येणाऱ्या एमएससीबीच्या आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झटके बसणार आहेत. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा गर्भित इशाराच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी यावेळी दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!