कृषी विभागामुळेच बियाणे टंचाई : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकऱ्यांना सोयाबीनसह इतर बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. त्याला कृषी विभागाची यंत्रणा जबाबदार आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एका ऑनलाईन खरीप परिषदेमध्ये ते शुक्रवारी बोलत होते

यावेळी बोलताना ते म्हणाले, गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी सोयाबीनच्या बियाण्यांची टंचाई निर्माण होणार याचा अंदाज आधीपासूनच होता त्यामुळे कृषी विभागाने मे महिन्यापासून बियाणे पुरवठ्याचे नियोजन करायला पाहिजे होतं त्यात हयगय झाल्यामुळे शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्याचे बियाणे कायदे सदोष असल्यामुळे बोगस बियान्यांच्या प्रकरणात कंपन्या सहीसलामत बाहेर पडतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले

पुढे बोलताना ते म्हणले, पीक कर्जाच्या बाबतीत मुख्यमंत्री बँकांना केवळ सज्जड दम देतात. परंतु बँकांच्या कार्यपद्धतीवर त्याचा काही परिणाम होत नाही. काही बँकांवर कारवाई करून त्यांना शेतकऱ्यांना कर्ज द्यायला भाग पाडले तर आपोआप सगळ्या बँकांवर वचक बसेल असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. खरीप पिकांना दीडपट हमीभाव देण्याचा केंद्र सरकारचा दावा फसवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात आहे. ते उत्पन्न कमी होण्याची भीती आहे असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!