सोयाबीनच्या बोगस बियाण्यावर जालीम उपाय, कृषिमंत्र्यांनी दिला ‘हे’ बियाणे वापरण्याचा सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं मात्र आता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्याबाबत महत्त्वाचा आवाहन केला आहे. बोगस बियाणे मुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणं वापरावं असं आवाहन दादाजी भुसे यांनी केले आहे. सध्या भारतासह महाराष्ट्रात कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या संकटात ही शेती संबंधित बियाणे, दुकान कंपन्या या सर्वांना निर्बंधातून वगळण्यातआले आहे त्यांचं काम सुरू असल्याचं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, ‘संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बोगस बियाणे वापरण्याऐवजी सोयाबीनचं घरगुती बियाणं वापरावं. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून घरगुती बियाण्यांच्या वापराविषयी मोहीम सुरू असल्याचं दादाचे भुसे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पीक कर्ज वाटपाबाबत बोलताना कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले की ‘पीक कर्ज वाटप ही दरवर्षी चालणारी प्रक्रिया आहे. यासंदर्भात नव्यानं निर्देश देण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. व्याज सवलतीचे निर्देश बँकांना प्राप्त झाले नसल्याचं विचारलं असता त्यांनी डॉ पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना एक लाखापर्यंत आहे ही जुनी योजना आहे तिची मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती दिली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमी भासणार नाही याची दक्षता देखील कृषी विभाग घेत असल्याचा तसेच बोगस बियाण्यावर धडक कारवाई करण्यात येईल यासंदर्भात कोणी दोषी आढळल्यास मोठी कारवाई करण्यात येईल असेही दादाजी भुसे म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!