आंदोलन मागे घेण्याचे कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील सात महिन्यांपासून आंदोल सुरु आहे. शेतकऱ्यांनी शनिवारी भारतभर शेती बचाव लोकशाही बचाव दिन साजरा केला. या आंदोलना दरम्यान त्यांनी हरियाणाच्या पंचकुलात बॅरिकेड्स तोडून राजभवना कडे धाव घेतली. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्राची नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची देखील तयारी असल्याचे सांगितले आहे.

केंदीय कृषी मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शनिवारी याबाबत माहिती दिली त्यांनी म्हंटले आहे की, मी सर्व शेतकरी बांधवाना सांगू इच्छितो की त्यांनी आपले आंदोलन समाप्त केले पाहिजे. भारत सरकार ने एम एस पी मध्ये सुधार केला आहे. नव्या एमएसपी मुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल. तरीही किसान युनियनला काही समस्या असेल तर भारत सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार आहे. तसेच चर्चा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तयार असेल असे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी संगितले आहे.

तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनाला जवळजवळ सात महिने पूर्ण झाले, पण तरीही सरकारने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी आत्तापर्यंत संयमी भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांनी शनिवारी आक्रमक होत पंचकूला तील बॅरिकेड्स तोडून पंजाब हरियाणा चा राज भवन कडे धाव घेतली.
याला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी थंड पाण्याचा फवाऱ्यांचा मारा आंदोलनकर्त्यांवर केला परंतु ते मागे हटले नाहीत. राज्यपालांना कृषी कायदा रद्द करण्याचे निवेदन सोपविल्या शिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच हे आंदोलन शांततापूर्ण असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.. शनिवारी संपूर्ण देशात शेतकर्‍यांनी शेती बचाओ, लोकशाही बचाओ दिन साजरा केला कारण शनिवारी शेतकरी आंदोलनाला सात महिने व आणीबाणीला 46 वर्ष पूर्ण झाले. या आंदोलनांतर्गत हजारो शेतकऱ्यांनी आप आपल्या राज्यातील राजभवनावर मोर्चे काढले अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा ने एका निवेदनाद्वारे दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!