कृषिप्रक्रिया उद्योग : केळीपासून ‘हा’ पदार्थ बनवून कमवा नफा ; जाणून घ्या साधनांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जर तुम्ही कृषिपूरक छोट्या गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक छोटासा परंतु अत्यंत फायदेशीर व्यवसायाबद्दल आज आम्ही माहिती देत आहोत. तो व्यवसाय म्हणजे केळीचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय. चला तर मग या लेखात माहिती करून घेऊ या व्यवसायाबद्दल…

केळीचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे वापरली जातात महत्त्वाचं म्हणजे प्रामुख्यानं कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि काही प्रकारचे मसाले कच्चामाल म्हणून या व्यवसायात वापरले जातात.

लागणारी उपकरणे

1- केळी वाशिंग टॅंक आणि केळी सोलण्याची मशीन

2- केळी कटिंग मशीन

3- फ्रंयिंग मशीन

4- पाउच प्रिंटिंग मशीन

5- प्रयोगशाळा उपकरणे

हे उपकरणे कुठे खरेदी करता येऊ शकता?

केळीचा चिप्स चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com/ किंवाhttps://india.alibaba.com/index.html वरून वरील मशीन खरेदी करू शकता.

लागणारी जागा उपकरणाचा खर्च

हे उपकरण ठेवण्यासाठी कमीत-कमी 4000 ते 5000 चौरस फूट जागेची आवश्यकता असते. हे उपकरणे साधारणता आपल्याला 28 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळतात.

50 किलो चिप्स बनवण्यासाठीची माहिती

— 50 किलो चिप्स तयार करण्यासाठी कमीतकमी 120 किलो कच्ची केळी आवश्यक असते.
–120 किलो केळीचा खरेदी खर्च सुमारे हजार रुपये असतो.
–त्यासाठी तुम्हाला 12 ते 15 लिटर खाद्यतेल लागते. तेलाची किंमत १५० रुपये नुसार 1800 रुपये तेलासाठी लागतात.
–चिप्स फ्रायिंग मशीन एका तासामध्ये 10 ते 11 लिटर डिझेल लागते.
–एक लिटर डिझेलची किंमत ९0 रुपये आहे. 11 लिटरच्या हिशोबाने ते 1000 रुपये होतात.
— मीठ आणि मसाले 3 हजार 200 रुपयांमध्ये तयार होतील.
–म्हणजे केळाचे चिप्सच्या एका पॅकेटची किंमत पॅकिंगच्या किमतीसह 70 रुपये असेल.
–जी तुम्ही ऑनलाईन किंवा किराणा दुकानात 100 किंवा 110 रुपये किलोने सहज विकू शकता.
–या हिशोबाने जर आपण एक किलो पाठीमागे 10 रुपयांचा प्रॉफिट पकडला तर आपण सहजपणे दिवसाला 4 हजार रुपयांचा नफा कमवू शकतो.
–जर आपली कंपनी एका महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर आपण एका महिन्यात एक लाख रुपये कमवू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!