राज्यातील सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाइन : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. तसंच, अण्णा हजारे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी देखील केली होती. याचा मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले.

राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अण्णा हजारे यांनी 25 जानेवारी २०२२ रोजी ची मागणी केली त्याचे पत्र आमच्याकडे आले नाही. त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि म्हणाले अण्णा हजारे यांना खोटं ठरवू नका, उत्तर सुधारा आणि अण्णा हजारे यांनी पत्र लिहिलं हे सर्वांना माहीत आहे. हे सरकारला माहित नाही म्हणून सरकार झोपलाय का ? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केला. यावर बोलताना पाटील म्हणाले अण्णा हजारे यांनी हे प्रश्न वारंवार उपस्थित केले आहेत. त्यावर फडणवीस म्हणाले अण्णा हजारे यांची तक्रार बाजूला ठेवली. मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत हे कारखाने विकले आहेत याची चौकशी होणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यावर पाटील म्हणाले ऍक्शन प्राइस ठरली त्या प्रमाणात ही विक्री झाली आहे.

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा गैरसमज झालाय …

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले जे कारखाने विकले गेले आहेत त्याच्या जमिनीची किंमत जास्त आहे. जे कारखाने विकले त्याच्यावर शंभर कोटी रुपयांचे कर्ज घेतला आहे याचा अर्थ त्याची किंमत जास्त आहे. अण्णा हजारे यांचा हाच आक्षेप आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. पवार म्हणाले , या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली गरज नसताना यावर गैरसमज निर्माण करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णा हजारे आणि राजू शेट्टी यांनी तुमच्याकडं आणि राज्यपाल आणि इतर ठिकाणी तक्रार केली त्यानंतर तुम्ही चौकशीचे आदेश दिले होते. यात एसीबी, सीआयडी आणि माजी न्यायाधीश यांच्या अंतर्गत चौकशी झाली. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा गैरसमज झालाय अनेक जण कारखाने चालवत आहेत ज्याला कारखाने चालवायचा असेल त्यांनी जा आणि कारखाने चालवा … आम्ही सोमेश्वर कारखाना चालवायला घेतला आम्हाला तिथे दहा कोटी रुपये पहिल्या वर्षी तोटा झाला बऱ्याच सदस्यांना याची माहिती नसते. भ्रष्टाचार झाला असा गैरसमज होतो. अनेक कारखान्यांची कोर्टाच्या निर्णयानंतर विक्री झाली आहे. मला नवल वाटतं की एकदा अण्णा हजारे यांना भेटाव आणि काय काय चौकशी झाली याची माहिती घ्यावी. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले अण्णा हजारे यांच्या पत्राची दखल घेतली पाहिजे. किसन वीर कारखाना अडचणीत आला कारण मदनदादा आमच्याकडे आले. त्यांना कर्ज देणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे कारखाना अडचणीत आला आहे . देवेंद्र फडणवीस आणि पाच कारखान्यांना हमी दिली त्यानंतर एकाही कारखान्याला हमी देणार नाही असं सांगण्यात आलं. त्यानंतर एकही कारखान्याला हमी दिली नाही. यावर पाटील म्हणाले मी अण्णा हजारे यांना भेटून एसआयटी आणि जाधव कमिटीचा अहवालालाची माहिती देणार आहे.

पुढे राज्यातला थकबाकीदार कारखान्यात बाबत देखील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की आता सरकार सहकारी साखर कारखान्यांना हमी देत नाही जो तो स्वतःच्या ताकदीवर कारखाना चालवतोय. अनेक बँका कर्ज दिल्यामुळे आतापर्यंत अडचणीत आला होता. मात्र सध्या राज्य सहकारी बँकेचा नफा 380 कोटींवर गेला आहे अशी माहिती त्यांनी दिली याला फडणवीस सरकारचा ही योगदान आहे हे सांगायला अजित पवार विसरले नाहीत.

Leave a Comment

error: Content is protected !!