अलर्ट…! राज्यातल्या ‘या’ भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कायम असून आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील विविध भागात पावसाने कहर केला अनेक शहरांनी जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दरम्यान आजही 11 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मुंबई ठाणे पुण्यासह अनेक जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट आज(८) जारी करण्यात आला आहे. पालघरला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कायम असून आजही अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला गडगडाटी सह अति मुसळधार, अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने पालघर जिल्हा त्याचबरोबर ठाणे मुंबई पुण्यासह किनारपट्टी लगतच्या भागाला ऑरेंज कलर इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात कधी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

औरंगाबादेत मुसळधार पाऊस

शहरावर मंगळवारी सायंकाळी अक्षरश: आभाळ फाटले आणि ढगांचा गडगडाट व विजेच्या लखलखाटात कोसळलेल्या पावसाने एकच हाहाकार माजविला. ताशी 60 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस कोसळला. शहरातील विविध भागातील शेकडो घरे, दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, घरात साचलेले पाणी काढताना रात्रभर नागरिकांची दमछाक झाली.

एमजीएम वेधशाळेत सायंकाळी सात वाजून दहा मिनिटे ते रात्री आठ वाजून दहा मिनिटे दरम्यान 87.6 मिलिमीटर तर चिकलठाणा वेधशाळेत 116.0 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात वीज गेल्याने शहर अंधारात बुडाले होते

Leave a Comment

error: Content is protected !!