मुंबई ,रायगडसह ‘या’ भागात अलर्ट! मान्सून जोरदार कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील मुंबई आणि किनारपट्टी भागावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता त्यानुसार मुंबई आणि रायगड परिसरात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत. शहर आणि उपनगर परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसतोय. हवामान खात्यानं 9 ते 13 जून दरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता हा अंदाज आता काही प्रमाणात खरे ठरताना दिसतो आहे.

रायगड जिल्ह्यात अलर्ट

मुंबईबरोबरच रायगड जिल्ह्यात देखील मंगळवारपासून रिमझिम पाऊस सुरु झाला. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने कालच जिल्ह्यात अनेक भागात जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम अशी हजेरी लावली. उद्या म्हणजे १० आणि ११ तारखेला या भागात अतिवृष्टी होण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवस रायगड करांसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनास सर्व यंत्रणा सतर्कतेचे आदेश दिला आहे. तसेच समुद्र, नदी, धरण, वाहत्या पाण्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. समुद्र आणि खाडीकिनारी गावांना आणि नागरिकांना प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.

पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार कोसळणार

हवामान विभागाचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि आसपासच्या भागात मागच्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. बेलापूर येथे 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नुकत्याच उपलब्ध झालेल्या सॅटॅलाइट इमेज नुसार मुंबई आणि ठाणे पश्चिम किनारपट्टी या भागावर दाट ढग साचले आहेत. तसेच या भागात सतर्क राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम किनारा मध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!