हवामान खात्याकडून अलर्ट जारी ! राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: येत्या चार दिवसात आरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना किनार्‍यावर परत होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता राज्यासमोर संकट निर्माण झाला आहे.

उद्यापासून अरबी समुद्रात चक्रीवादळची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अरबी समुद्रात मच्छीमारी सोबत अन्य बोटींना लवकरात लवकर किनारपट्टीवर घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचबरोबर 15 मे च्या आसपास काही दिवस मच्छीमारांनी आरबी समुद्र मालदीव, कमोरिन, लक्षदीप, आणि केरळ किनारपट्टीच्या समुद्री भागात फिरकू नये असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यासोबतच सध्या मालदीव, लक्षदीप आणि अरबी समुद्रात मासेमारीसाठी किंवा पर्यटनासाठी समुद्राचे गेले आहेत त्यांनी १२ मे च्या रात्रीपर्यंत किनारपट्टीवर परतण्याची गरज आहे. त्यानंतर समुद्रातील हालचाली धोकादायक ठरू शकतात त्यामुळे 14 मे च्या रात्री पासून केरळ लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

राज्यातीळ इतर भागात हवामान

दरम्यान सोमवारी खानदेशातील जळगाव येथे सर्वाधिक 42 पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. सध्या मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे. विषुवृत्त कडून वाऱ्याचे प्रवाह येण्यास सुरुवात झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे मान्सूनचा प्रवास आणखी बळकट होण्यास मदत मिळणार आहे अंदमान निकोबार बेटांवरील मान्सून दाखल झाल्याची वर्दी लवकरच मिळणार आहे. या भागात साधारण 10 ते १८ मेपर्यंत मान्सून दाखल होतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा व विदर्भ या भागात पूर्वमोसमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!