अलर्ट…! शेतमाल जपून ठेवा ,’या’ जिल्ह्यांत विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यातील बहुतांश भागातून थंडी गायब झाली असून उकाड्यात वाढ झाली आहे. आज दिनांक 3 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही पावसाला पोषक हवामान आहे. मंगळवारी दिनांक 27 दुपारपासूनच अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होऊ लागले.

या भागात कमी दाबाचे क्षेत्र

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यतः कोरडे हवामान आहे. पावसाला पोषक हवामान होताच तापमान आणि उकाड्यात वाढ होऊन गारठा नाहीसा झाला. मंगळवारी गोंदिया इथं नीचांकी 14.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर रत्नागिरीत उच्चांकी कमाल तापमान 36.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.श्रीलंका आणि तमिळनाडू किनाऱ्या लगतच्या समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून उत्तर श्रीलंका आणि कामावरून भागामध्ये सक्रिय आहे या प्रणाली आज दिनांक 3 रोजी अरबी समुद्राकडे सरकणार आहे त्यानंतर उत्तरेकडे येताना हे क्षेत्र आणखी ठळक होण्याचे संकेत आहेत.

येथे पावसाची शक्यता

कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद लातूर नांदेड या भागात वीज आणि मेघगर्जना सह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आल्यात या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून निजलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेतमाल जपून ठेवा

सध्या सोयाबीन, कपूस पिकांची काढणी , मळणी यांची कामे पूर्ण झाली आहेत. काढणी केलेला शेतमाल अचानक आलेल्या पावसामुळे खराब होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षित ठेवा. त्यामुळे शेतमालाचे नुकसान होणार नाही. तसेच विजा चमकत असतील तर योग्य ती खबरदारी घेणे महत्वाचे आहे अशावेळी घरातून बाहेर पडू नका.

Leave a Comment

error: Content is protected !!