आंबा व डाळींबाच्या निर्यातक्षम बागेची नोंदणी करण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

राज्यातुन युरोपियन युनियन आणि इतर देशामध्ये आंबा व डाळिंब निर्यातीसाठी अपेडाच्या सहकार्याने मॅगोनेट व अनारनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा व डाळिंब बाग नोंदणीचे काम सुरु असून 31 मार्च 2022 पर्यंत त्यास मुदतवाढ दिली आहे. तरी संबधित शेतक-यांनी आपल्या बागांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी यांनी केले आहे. आंबा व डाळिब निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात निर्यातक्षम आंबा व डाळिंब बागांची नोंदणी ,तपासणी ,किड आणि रोगमुक्त हमी ॲगमार्क प्रमाणिकरण फायटेसॅनीटरी प्रमाणिकरण या बाबी मॅगोनेट व अनारनेट प्रणालीद्वारे होतात. निर्यातक्षम बागाची नोदणी, नुतनीकरण करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक ,कृषि पर्यवेक्षक आणि तालुका कृषि अधिकारी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!