Apple Cultivation : ‘यु ट्यूब’ ची कमाल आणि बीड जिल्ह्यात फुलली सफरचंदाची बाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सफरचंद म्हंटलं की भारतातलं काश्मीर हेच ठिकाण आठवतं. मात्र महाराष्ट्रात (Apple Cultivation) देखील आता सफरचंदाची यशस्वी शेती होऊ लागली आहे. एवढंच काय दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातही सफरचंदाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आज जाणून घेऊया याच बाबत

दीड एकरामध्ये फुलवली सफरचंदाची बाग

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या तेलगाव खुर्द इथल्या एका शेतकऱ्याने दीड एकरामध्ये सफरचंदाची बाग फुलवली आहे. या झाडांना चांगली फळ देखील लागली आहेत. सुरेश सिताराम सजगणे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. तेलगाव खुर्द येथील शेतकरी सुरेश सिताराम सजगणे आणि बाळासाहेब सिताराम सजगणे या दोन भावांच्या मध्ये मिळून 40 एकर शेती आहे यातील सुरेश सजगडे यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालय ते आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात.

एचआरएमएन जातीची लागवड

कोरोना काळात युट्युबचा वापर करत सुरेश सजगणे हे वेगवेगळी फळ शेती आणि इतर पिकांची माहिती पाहत होते. मे 2020 मध्ये त्यांनी सफरचंदाची बाग पाहिली त्यांनाही आपण सफरचंदाची फळबाग (Apple Cultivation) करून पहावी असं वाटलं आणि त्यानंतर हरीमन शर्मा या हिमाचल प्रदेश येथील शेतकऱ्याशी त्यांनी संपर्क साधला. सजगणे यांनी आपल्याकडील जमिनीचा प्रकार, तापमान आणि हवामानासह भौगोलिक माहिती शर्मा यांना दिली आणि त्यानंतर शर्मा यांनी त्यांच्या शेतात एचआरएमएन या जातीची सफरचंदाची झाडं चांगल्या प्रकारे येऊ शकतात असं सांगितलं.

ऑनलाईन मागवली रोपं

त्यानंतर सजगणे यांनी मोठ्या धाडसानं सफरचंदाची 600 रोप ऑनलाईन मागवली यापैकी त्यांनी 400 रोप आपल्या दीड एकर शेतात लावली. या झाडांमध्ये 12×15 असं अंतर ठेवलं डिसेंबर 2020 मध्ये ही रोप लावली गेली. तर बाकीचे दोनशे रोपं त्यांनी नातेवाईकांना दिली सफरचंदाच्या (Apple Cultivation) सर्वच झाडांना ड्रिप करून चार-पाच दिवसांनी पाणी दिलं तरी चालतं.सफरचंदाच्या झाडाला जानेवारी महिन्यात फुले येत असतात त्यानंतर एक ते दीड महिन्यांनी फळ लागायला सुरुवात होते. तर जून जुलैमध्ये ही फळ तयार होतात अशी माहिती शर्मा यांनी सजगणे यांना दिली होती आणि त्यानुसार ती झाडं जोपासली गेली असं सुरेश सजगणे यांनी सांगितले.

सफरचंदाच्या बागेत आंतरपिके

सजगणे यांनी सफरचंदाच्या शेतात मागील दीड वर्षात टरबूज मिरची आणि झेंडू अशी तीन पिकं घेऊन जवळपास सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलंय त्यात सर्व खर्च वजा करता चार लाख रुपये उरले अशी माहिती सफरचंद (Apple Cultivation) उत्पादक सुरेश सजगणे यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!