आजपासून स्वीकारले जात आहेत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज, जाणून घ्या सर्व माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे अर्ज १४ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २:०० वाजल्यापासून ऑनलाइन स्वीकारले जात आहेत. या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.

१)सरकार शेतकर्‍यांना ६०% अनुदान देईल
२)३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
३)शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.

या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करू शकतो.

लाभार्थी निवडीचे पात्रता, निकष

१)अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
२)ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
३)२.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.
४)अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
५)सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
६)अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
७)सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
८)जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.
प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.

कुसुम योजनेचे लाभार्थी

१)शेतकरी
२)सहकारी संस्था
३)शेतकर्‍यांचा गट
४)जल ग्राहक संघटना
५)शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना महत्वाची कागदपत्रे

१)आधार कार्ड
२)पासपोर्ट साईझ फोटो
३)रेशन कार्ड
४)नोंदणी प्रत
५)प्राधिकरण पत्र
६)जमीन प्रत
७)चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
८)मोबाइल नंबर
९)बँक खाते विवरण

कुसुम योजना अर्ज फी

या योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल.
०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
१ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
१.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
२ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी

PM कुसुम योजना २०२१ महत्वाची संकेतस्थळ

१)अधिकृत वेबसाईट – https://mnre.gov.in/

२)ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://www.mahaurja.com/meda/en/node

३)ऑनलाईन अर्ज नोंदणी – https://kusum.mahaurja.com/solar/benf_login

Leave a Comment

error: Content is protected !!