सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत आहेत ? जाणून घ्या कारणे व उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे

ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील हळद, अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाची पाने पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. सोयाबीन पिकाच्या बाबतीत असे घडत असल्यास यामागची करणे काय आहेत ? तसेच त्यावर उपाय कोणते करावेत याबाबत आजच्या लेखात जाणून घेऊया…

निरिक्षण केलेली कारणे

1) ज्या जमिनी गावालग गढीची माती किंवा पांढरी माती अशा जमिनीत. लोह म्हणजे फेरसच्या कमतरते मुळे सोयाबीन व ईतर पिके सुरुवातीपासुन पांढरट पिवळी पडतात.
2) चोपन जमिनीत किंवा चुनखडीचे प्रमाण आसलेल्या जमिनीत काही ठिकाणी ईतर जमिनित सुद्धा जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचुन मुळांना हवा न लागल्यामुळे अन्न द्रव्याची कमतरता विशेषतः लोह(फेरस),जस्त (झिंक ) , नत्र व पालाश ची कमतरता जाणवते.
3) या वर्षी ब-याचशा शेतकरी बंधुनी हळद वअद्रक ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रने लागवड केली. या पेरणी मुळे हळद व अद्रक खुप खोल पडते जवळ पास 1 फुटा पर्यंत असल्याचे मी बघीतले. यावर जोराचा पाऊस पडल्यानतर जमिन पक्व होते व खुप खोल पडल्यामुळे कोंब वर यायाला खुप ताकद आणि वेळ लागतो व तसेच मुळांना हवा न लागल्यामुळे परत वरील अन्न द्रव्याची कमतरता. जाणवते.
4) बरेच शेतकरी मागील हंगामात शिल्लक आसलेले सोयाबीन, हरबरा गव्हाचे कुटार शेतात पसरुन देतात अशा ठिकाणी किंवा काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेले शेणखत वापरलेल्या ठिकाणी झाडे सुरवातीला पिवळी पडतात व नंतर बुडाजव स्केलोरोशिअम म्हणजे पांढऱ्या बुरशीची वाढ होते व उभळ लागते. हे एक कारण आहे.
5)काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी म्हैस किडीचा प्रादुभाव जास्त प्रमाणात दिसतात. आशा ठिकाणी पिकाचा जमिनीखालील भाग ह्या किडीची अळी व म्हैस किडा कुरतडुन खातो व झाडाला ईजा होतात झाड मरत नाही पण पिवळे पडते व वाढ खुंटते.
6) ज्या जमिनीत मागिल हंगामात उन्हाळ्यात शेवटपर्यंत ओलित केले गेले आशा ठिकाणी सुद्धा पिका मध्ये वरील अन्न द्रव्याची कमतरता येऊन पिक पांढरट पिवळे झाल्याचे दिसुन येते.
7) ज्या जमिनी लालसर भुरकट हलक्या आहेत आशा जमिनित पालाशाची व नत्राची कमतरता येते. पालाशाची कमतरता ओळखतांना झाडाची पाने पानाच्या कडेकडून सुरुवातीस पिवळसर व नंतर लालस करड्या किंवा तपकीरी होऊन वाळायला लागतात. अशा प्रकारे वेगवेगळी कारणे आहेत.

यासाठी खालील उपाय करावा

1) जेथे पांढऱ्या जमिनी आहेत किंबहुना सर्वच जमिनीत पेरते वेळेस एकरी 10 किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट + 10 किलो गंधक व खत वापरताना पोट्याश असलेले खत जसे 10-26-26 , 12-32-16, 14-35-14 आशी खत वापरावी व बियाण्याला रायझोबीअम पीएसबी व केएम बी ची या द्रवरुप संवर्धकाची 10 मिली व ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
2) पिक पिवळे दिसुन आल्यास शुक्ष्मआन्नद्रव्याचे मिश्रण( जसे चिलमिक्स किंवा लिब्रेल ) 20 ग्रॅम
किंवा फेरस edta 15 ग्रॅम + झिंक edta ग्रॅम व 19-19-19 70 ग्रॅम किंवा युरीया 2% प्रती पावरस्प्रे घ्यावे.
3) लालसर जमिनित पोट्याशची कमतरता दिसुन येते आशा जमिनित पोट्याशयुक्त खत पेरतेवेळेसच द्यावे व फवारणीत 13-0-45 किंवा 00-00-50 70 ग्रॅम घ्यावे व सोबात वरिल प्रमाणे शुक्ष्मआन्नद्रव्ये घ्यावे.
4) शक्यतो कुटार व शेणखत चांगले कुजल्याशिवाय वापरुच नाही. किंवा आशा ठिकाणी कार्बन नत्र( C:N) गुणोत्तर कायम ठेवण्यासाठी सुरुवातीलाच 20 दिवसाच्या आत थोडा युरीया फेकावा. कारण काडी कचरा, कुटार कुजतांना शेतावरील नत्र वापरल्या जाते व नत्राची कमतरता येते. व तेथे गर्मी तयार होऊन झाडाला बुरशी लागते.

Leave a Comment

error: Content is protected !!