येवल्याच्या बाजर समितीत लाल कांद्याचे आगमन ; पहा किती मिळाला दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वर्षभर पैसे मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाची लागवड शेतकरी करीत असतात. नाशिकच्या येवला बाजारसमितीमध्ये लाल कांद्याची आवक झाली ही आवक केवळ २ वाहनातून झाली तरी देखील याचे जंगी स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी या कांदयाला २३०१ रुपये असा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कांदा दर वाढीच्या अपेक्षा वाढल्या

सध्याचा विचार करता साठवणूकीतला कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. तर यंदा पावसामुळे खरीप हंगामातील कांद्याचे नुकसान झाले आहे. तर मध्यंतरीच्या अवकाळीमुळे कांद्याची काढणी लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक ही घटत आहे. मध्यंतरी आयात केलेला कांदा बाजारपेठेत दाखल झाला होता. त्यामुळे कांद्याचे दर हे थेट 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले होते. मात्र, पुन्हा बाजारात कांद्याची आवक ही कमी होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी हे उन्हाळी कांद्याची साठवणूक करुन ठेवतात व योग्य दर मिळाताच विक्री करतात. मात्र, साठवणुकीतलाही कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येवला बाजार समितीमध्ये गुरुवारी दाखल झालेल्या कांद्याला 2301 रुपये असा दर मिळालेला आहे.

आवक घटल्याने दर वाढणार

कांद्याचे दर हे एका रात्रीतून वाढतात. यंदाही वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने साठवणूकीतला कांदा विक्रीसाठी काढला की, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. एवढेच नाही कांद्याची आवकही सुरु करण्यात आली होती. त्यामुळे 4 हजारवर पोहचलेला कांदा थेट 1 हजार रुपये क्विंटलवर आला होता. पण आता साठवणूकीतला उन्हाळी कांदा अंतिम टप्प्यात आहे तर खऱिपातील कांदा बाजारात येण्यासाठी बराच आवधी लागणार आहे. त्यामुळे अजून 10 दिवस तरी कांद्याचे दर हे टिकून राहतील असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संदर्भ : टीव्ही ९

Leave a Comment

error: Content is protected !!