पिकविम्यासाठी तब्बल ४६ लाख शेतकऱ्यांचे अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत गुरुवारी सकाळपर्यंत 46 लाख 41 हजार 382 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान अर्ज भरण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून देण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवला होता त्याला मंजुरी मिळालेली असल्याने येत्या 23 जुलै पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी धान, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, मका, तूर, भुईमूग, कारळा, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, कांदा, या पिकांसाठी विमा हप्ता भरला आहे. काही कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होत नसल्याचे घोषणापत्र 19 जुलैपर्यंत बँकेत दिले आहे. असं घोषणापत्र मुदतीत न दिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून विमा हप्ता परस्पर कापण्यात आला आहे.

दिनांक 14 जुलै च्या आकडेवारीनुसार 1. 66 लाख कर्जदार शेतकऱ्यांनी 34. 70 लाख बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. यातून 19.4 लाख हेक्‍टरवरील पिक विमा संरक्षित केला. शेतकऱ्यांचा हाच आकडा एका दिवसात म्हणजे 15 जुलैच्या सकाळ पर्यंत वाढून 46. 41 लाख शेतकऱ्यांपर्यंत गेला. तसेच विमा संरक्षित क्षेत्र वाढवून 26. 15 पंधरा लाख हेक्टर पर्यंत गेला आहे.

पिक विमा योजनेसाठी आतापर्यंत 46 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस आणि कोरोना प्रतिबंधासाठी असलेल्या निर्बंध व शेतकर्‍यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही त्यामुळे मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं होतं.

Leave a Comment

error: Content is protected !!