कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा ; पुण्याच्या कंपनीकडून शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात कडकनाथ नंतर आता शतावरी वनस्पती घोटाळा समोर आला आहे. शतावरी औषधी वनस्पती लावून मोठ्या आर्थिक फायद्याचे अमिश दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. एकरी 10 लाख रुपये 18 महिन्यात मिळतात असे सांगून एकरी 80 हजार फक्त खर्च होतात असे सांगून ऑनलाइन बँकिंग पद्धतीने सर्व शेतकर्‍यांकडून पैसे जमा करून घेतले व 18 महिन्यानंतर येणारे पीक प्रती किलो 250 रुपये प्रमाणे शिवाई ग्रो कंपनीकडून खरेदी घेणार असल्याची शेतकर्‍यांना हमी दिली.

शेतकर्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कंपनीकडून प्रत रोप 20 रुपये प्रमाणे शतावरीची रोपे खरेदी करू लागवड केली. त्यानंतर तीन वर्षे उलटली तरी कंपनीने कोणताच प्रतिसाद दिला नाही. या उलट कंपनीच्या संचालकांकडून शेतकर्‍यांना धमक्या दिल्या जात आहेत. यानंतर पुण्याच्या शिवाई कंपनीच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आज पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी बाळासो दाईंगडे, दिनकर शेंडगे, भास्कर पवार, शिवाजी माळी, शुभम साठे, रवींद्र नंदकुमार माने, बाळकृष्ण जाधव, सुदाम नाईकवडी, तेजस जाधव, आनंदा पाटील, संपतराव पाटील, विश्वास गोटखिंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!