सावधान…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी; पहा तुमच्या भागात कसे असेल हवामान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. राज्यातल्या अनेक भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायत. विदर्भात मात्र अवकाळी पाऊस सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात थोडीशी वाढ होत मंगळवारी दिनांक (11) रोजी निफाड व नाशिक येथे नीचांकी (10) अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. आज दिनांक 12 रोजी मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट कायम राहणार असून विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आली असून राजस्थान मधील सिक्रि येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून आलेल्या वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. तर ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटेस दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे. मंगळवारी दिनांक अकरा रोजी निफाड आणि नाशिक येथे नीचांकी दहा अंश सेल्सिअस तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी 30.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात ‘या’ भागाला अलर्ट जारी

हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात काही भागात पुढचे तीनही दिवस विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
12- आज दिनांक 12 रोजी यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा आणि गडचिरोली या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
13- दिनांक 13 रोजी यवतमाळ वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भागाला देण्यात आला आहे.
14- दिनांक 14 रोजी कोणतीही चेतावणी हवामान खात्याकडून देण्यात आलेली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!