कमालच झाली…! टेरेसवर फुलवली द्राक्षांची बाग , मिळतेय चांगले उत्पन्नही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक शेतीबरोबरच सध्या अनेक शेतकरी अधुनिक शेतीचे यशस्वी प्रयोग करताना दिसत आहेत. कमी खर्चात शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. वेळेनुसार वेगवेगळी फळे आणि भाज्यांची लागवड करून तुम्ही वर्षभर पैसे कमवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या शेतातून किंवा तुमच्या घरातील कोणत्याही छोट्या जागेतून सुरू करू शकता. असच एक प्रयोग पुण्यातल्या उरली कांचन भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने केला आहे. उरली कांचन येथील भाऊसाहेब कांचन यांनी आपल्या टेरेसवर द्राक्ष पिकाची लागवड केली आहे. एवढंच नाही तर ते त्यातून चांगला नफा देखील कमवत आहेत.

भाऊसाहेब यांची स्वतःची सुमारे ३ एकर जमीन असून, त्यात ते सर्व प्रकारची पिके घेतात. त्यांना शेतीची खूप आवड असून ती अबाधित ठेवल्याने त्यांनी घरी बागकाम करून नफा कमावण्याचा विचार केला. भाऊसाहेब कांचन हे 2013 मध्ये शेतकरी सहलीच्या निमित्ताने युरोप दौरा करून आले होते. त्यांनी हजारो एकरावरील द्राक्ष शेती पाहिली तसंच घरासमोर टेरेसवर द्राक्ष वेलींची केलेली लागवड पाहिली आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या घराच्या भिंती शेजारी द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. कांचन यांनी घराच्या बाजूला द्राक्षांच्या दोन रोपांची लागवड केली यावेळी या वेली जमिनीपासून तब्बल तीस फूट उंचीवर गेल्या असून ऐन हंगामात टेरेसवर द्राक्षघड लागलेले दिसतात. आता नया दोन वेलीन पासून 250 किलोपर्यंत उत्पादन मिळत आहे.

अशी केली लागवड

जानेवारी 2016 मध्ये मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातून (बेंगलोर पर्पल) या सुधारित वाणाची दोन रोपे त्यांनी आणली घराच्या भिंती जवळ तीन फूट खोल खड्डा खोदला आणि त्यात शेणखत आणि पालापाचोळा मातीत टाकून ही द्राक्ष रोपे त्यांनी लावली. त्यानंतर लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत वेलीची छाटणी न केल्यामुळे त्यांची जवळपास पन्नास ते साठ फुटांपर्यंत वाढ झाली. वेलीला भिंत आणि काठीचा आधार दिला. असे करत ही वेल टेरेस वर नेण्यात आली. तिथं मंडप उभारून वेलीला आधार देण्यात आला. लागवडीपासून आतापर्यंत द्राक्ष वेलींवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून न आल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फवारणीची गरज त्यांना भासली नाही. टेरेस वर द्राक्ष मण्यांचे पक्षांपासून संरक्षण होण्याकरिता त्यांनी काळ्या रंगाची जाळी टाकली आहे. सहा वर्षांमध्ये दोन वेलींच्या व्यवस्थापनासाठी साधारण सहा हजार रुपयांचा खर्च झाला. त्यात द्राक्ष रोप खत जिब्रेलिक एसिड जाळी आणि मंडप उभारणी इत्यादी साहित्य बाबींचा समावेश आहे.

बहर धरण्यासाठी 2 ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी वेलीची छाटणी केली. त्यानंतर चांगल्या प्रकारे फुटवे आणि घडनिर्मिती झाली. तयार मणी जिब्रेलिक एसिड च्या द्रावणात बुडवून पुढे मण्यांचा आकार वाढून त्यांना काळा जांभळा रंग येऊ लागला. साधारण फेब्रुवारी 2019 मध्ये ही द्राक्ष खाण्यास योग्य झाली. दुसऱ्या वर्षीही वेलींवर चांगल्या प्रकारे फळधारणा दिसली. तिसऱ्या वर्षी सेंद्रिय खताची मात्रा देऊन 19 सप्टेंबर 2021 मध्ये पुन्हा छाटणी केली. सध्या आधीच्या तुलनेत जास्त घट दिसून येत आहेत यंदा 25 जानेवारीपर्यंत द्राक्ष काढणीस तयार होतील अशी माहिती त्यांनी दिलीये

Leave a Comment

error: Content is protected !!