परभणीत जायकवाडीच्या बी 59 वितरीकेची बँकिंग फुटली ; लाखो लिटर पाणी वाया, शेतीचेही नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी

जायकवाडी उपविभाग पाथरी अंतर्गत येणाऱ्या बी ५९ मुख्य कॅनॉल ची बँकींग (भराव) पाण्याच्या दाबाने फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारामध्ये शुक्रवार 25 मार्च रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे .

पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील डावा कालवा ते मानवत तालुक्यातील कुंभारी शिवारा पर्यंत जायकवाडीचे पाणी नेण्यासाठी बी ५९ हा मुख्य कॅनॉल आहे . शुक्रवार २५ मार्च रोजी संध्याकाळी २ वाजण्याच्या सुमारास वाघाळा येथील शेतकरी जयराम नवले यांच्या गट क्रं २८३ शेतामध्ये बी ५९ कॅनॉलला करण्यात आलेल्या मातीच्या भरावाला पाण्याच्या दाबाने अचानक भगदाड पडले .त्यामुळे पूर्ण क्षमतेने भरून जात असलेल्या कॅनॉल मधून लाखो लिटर पाणी शेजारील शेतामधून वाहून गेले . दरम्यान या शेतामध्ये ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरल्याने ऊसतोड मजुरांचे संसारोपयोगी साहित्य भिजून गेले आहे . फुटलेली कॅनॉल बँकिंग जेसीबी मशीनचा वापर करत माती, मेनकापड व कडबा च्या सहाय्याने स्थानिक शेतकऱ्याने तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केला असून पाण्याचा दाबाने तो पुन्हा फुटू शकतो अशी शक्यता आहे .दरम्यान घटनास्थळी जायकवाडी उपविभागाचे अभियंता व त्यांच्या पथकाने भेट दिल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे .

याबाबत बोलताना शेतकरी जयराम नवले वाघाळा यांनी सांगितले की , ” १९९७ साली अशाच प्रकारे बँकिंग फुटल्याने माझ्या पिकांचे ,शेताचे नुकसान झाल्याची घटना घडली होती .आता परत ही घटना घडली असून माझ्या शेतातील सुपिक माती वाहून जात नुकसान झाले आहे . त्यात केलेला माती भराव पुन्हा पाण्याने पुन्हा फुटण्याची शक्यता आहे .यासंदर्भात जायकवाडी उपविभाग पाथरी यांना माहिती दिली होती परंतु बँकिंग दुरुस्ती संदर्भात दुर्लक्ष होत आहे . त्यामुळे माझ्या शेतीचे नुकसान होत
आहे ” .

Leave a Comment

error: Content is protected !!