स्मार्ट कॉटन उत्पादक शेतकरी व्हा ; प्रकल्प आत्मा संचालकांचे शेतकऱ्यांना धडे 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी : गजानन घुंबरे

कृषी विभाग संलग्न कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था अर्थात ‘आत्मा’ चे जिल्हा प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे स्मार्ट कॉटन अंतर्गत शेती शाळेमध्ये कापुस व्यवस्थापनासंदर्भात प्रत्यक्ष शेतावर जात स्थानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .

स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत रेणाखळी येथे शेतीशाळेचे कृषी विभाग व प्रकल्प आत्माच्या वतीने 3 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी परभणीचे आत्मा प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी भेट देत स्थानिक शेतकऱ्यांना स्मार्ट कॉटन योजनेअंतर्गत गटाने उत्पादित केलेल्या कापुस विक्री व्यवस्थापन , पिकातील सापळा पिकांचे महत्त्व व कापुस पिकातील कीड व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करत स्मार्ट कॉटन उत्पादक शेतकरी होण्याचे आव्हान केले.

दरम्यान येथून जवळच असलेल्या पाथरगव्हाण बु .गावात नवोदय शेतकरी गटाने औजार बँक प्रस्तावीत केली असल्याने या औजार बँकेची स्थळ पाहणी प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी भेट देत केली. स्थानिक गटातील शेतकरी या औजार बँकेत ट्रक्टर , ट्रक्टर चलीत 5 शेती मशागत करणारी औजारे व शेडची उभारणी करणार आहेत . यामुळे गावातील शेतकरी गट आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार असून गावातील शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये शेती मशागत करून मिळणार आहे .

प्रकल्प संचालक आळशी यांनी सदरील गटाच्या अवजार बँकेसाठी स्थळपाहणी करत पोखरा योजने अंतर्गत गोदाम योजना , फळबाग लागवड व प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनेबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ कृषी अधिकारी व्ही.एस.नांदे ,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल , सहाय्यक व्यवस्थापक नितीन जाधवर , गावातील शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांचीही लक्षणीय उपस्थिती होती .

Leave a Comment

error: Content is protected !!