पशुपालकांनो सावधान ! ‘या’ वनस्पतींच्या खाण्यामुळे जनावरांना होते विषबाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुपालकांनो पावसाळा म्हंटल की चाऱ्याची काही चिंता पशुपालकांना सहसा नसते. कारण पावसाळ्यात हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो मात्र बऱ्याचदा जनावरांकडून असा पाला किंवा वनस्पती खाल्ल्या जातात ज्या त्यांच्या जीवासाठी धोकादायक असतात. आजच्या लेखात आपण यांचा विषयी जाणून घेणार आहोत. शिवाय पावसाळ्यातील जनावरांना होणारे रोग आणि घ्यावयाची काळजी याची माहिती घेऊया…

या वनस्पतींच्या खाण्यामुळे विषबाधा

पावसाळा ऋतूमध्ये अनेक वनस्पती सोबतच विषारी वनस्पती उदा. निळी फुली व माठ/काटेमाठ या देखील वाढतात. या वनस्पती पशुधनाच्या खाण्यामध्ये आल्यास विषबाधा होते. माठ/काटेमाठ खाण्यात आल्यास त्यातील नायट्रेटची विषबाधा होऊन श्वसन संस्थेवर परिणाम होऊन मृत्यू ओढवतो. निळीफुली ही वनस्पती खालल्यास किडणीवर परिणाम होतो म्हणून अशा वनस्पती खाण्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, व खाण्यामध्ये आल्यास तात्काळ औषधोपचार करावा.

पावसाळ्यात जनावरांना घातसर्पचा धोका

पावसाळयामध्ये पशुधनामध्ये घटसर्प हा विषाणूजन्य आजार एक घातक रोग आहे. या रोगामधील फुफुसाचा दाह (न्यूमोनिया) हा प्रकार जिवघेणा ठरतो. जनावरे अचानक आजारी पडणे, नाकावाटे श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे प्रामूख्याने आढळतात. वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याची भिती असते. मात्र पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची वेळी मात्रा दिल्यास हा रोग बरा होतो. हा रोग होऊच नये म्हणून आपल्या जनावरांचे लसीकरण करता येईल.

पीपीआर या विषाणूजण्य रोगाचा प्रादूर्भाव

पावसाळयाच्या सुरुवातीस वाढत जातो. म्हणून या रोगावर उपलब्ध असलेल्या लसीचे तिन महिने व त्यावरील वयोगटातील शेळी-मेंढीच्या पिल्लांमध्ये लसीकरण करून घ्यावे. ही लस गर्भ धारण शेळी-मेंढी मध्ये करू नये.

पावसाळ्यात जनावरांची कशी काळजी घ्याल ?

पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही आणि त्यांचे शरीर तापमान कमी होणार नाही. भिजल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह होण्याची शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या उद्भवणार नाही. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.

Leave a Comment

error: Content is protected !!