सतर्क रहा …! महाराष्ट्रात आज विजांसह, वादळी पावसाचा इशारा , ‘या’ भागांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ मराठवाड्यात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर गेल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोकण , पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीचा तडाखा बसतो आहे. संध्याकाळनंतर अचानक वादळी वारा आणि विजांसह पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आजही राज्यातील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पावसामुळे शेतीसह मालमत्तेचे नुकसान
सोमवारी सोलापूर ,सातारा , कोल्हापूर ,लातूर या भागात वादळी वारा आणि विजांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर , शिरताव , वरकुटे – मलवडी परिसरात रात्री १० घ्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या वादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली. व देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघूनाथ बाबर यांची एक एकर आंबा रात्रीच्या अवकाळी पावसात भुईसपाट झाली आहे. तर सोलापुरात काल झालेल्या वादळी वारे आणि गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांसह राहते घर तसेच शाळेचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाल आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवात हे नुकसान झाले आहे.

आज ‘या’ भागाला यलो अलर्ट
१)रत्नागिरी
२)सातारा
३)सांगली
४)कोल्हापूर
५)सिंधुदुर्ग
६)सोलापूर

कुठे किती तापमान ?

पुणे ३८.६, धुळे ४१.०, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर ३१.०, मालेगाव ४२.८, नाशिक ३७.१, निफाड ३६.१, सांगली ३६.१, सातारा ३७.९, सोलापूर ४०.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३५.१, रत्नागिरी ३२.७, औरंगाबाद ४१.०, नांदेड ४०.६, परभणी ४०.५, अकोला ४३.९, अमरावती ४२.६, बुलडाणा ४०.५, ब्रह्मपुरी ४२.१, गोंदिया ४१.२, नागपूर ४१.२, वर्धा ४२.२, वाशीम ४२.५.

Leave a Comment

error: Content is protected !!