शेतमालाचे व्यवहार करताना सावधान रहा ! हळद व्‍यापाऱ्याकडून 11 शेतकऱ्यांना 31 लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : व्यापाऱ्यांकडून अनेकदा शेतकऱ्यांना फसवाल्याच्या घटना समोर येतात. आता सातारा तालुक्यातील विविध ११ शेतकऱ्यांची हळद व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तब्बल ३१ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली आधीकी माहिती अशी की, खरेदी केलेल्‍या हळदीचे पैसे न देता सातारा तालुक्‍यातील विविध गावांतील ११ शेतकऱ्यांची ३१ लाखांची फसवणूक केल्‍याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात एकावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. राजकुमार रमेशचंद्र सारडा (रा. दौलतनगर, करंजे, मूळ रा. महावीरनगर, सांगली) असे संशयित व्यापाऱ्याचे नाव आहे.

हळद व्यापाऱ्याकडून फसवणूक

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मर्ढे (ता. सातारा) येथे विजय तुकाराम शिंगटे हे राहण्‍यास असून त्‍यांची शेती आहे. २०१८ मध्‍ये मर्ढे, वडूथ, मालगाव परिसरात त्‍यांची राजकुमार सारडा याच्‍याशी ओळख झाली. मी हळदीचा व्‍यापारीअसून, त्याने शिंगटे व इतरांना सांगितले. यानुसार शिंगटे यांनी हळद सारडाला दिली. या हळदीची वजने, पावत्‍या लिहून झाल्‍यानंतर तिची किंमत ८ लाख ५३ हजार इतकी झाली. हळदीची रक्कम येणे असतानाच शिंगटे यांनी सारडा याला पुन्‍हा २ लाख दिले. दरम्‍यान, मर्ढे येथील मनजित काटकर व विकास जाधव आणि इतर सात तसेच वडूथ येथील तीन शेतकऱ्यांनी देखील आपली हळद सारडा याला दिली. हळद खरेदीपोटी सारडाकडून शेतकऱ्यांना प्रत्‍येकी दीड ते साडेतीन लाख रुपये येणे बाकी होते.

चेक वटलेच नाहीत

खरेदी केलेली हळद नंतर सारडा याने साताऱ्यातील एका ट्रकमधून इतरत्र हलवली. विजय शिंगटे व इतर शेतकऱ्यांनी पैशांसाठी पाठपुरावा सुरु केला. यावेळी सारडाने त्‍यांना धनादेश दिले, मात्र ते खात्‍यात पैसे नसल्‍याने वटले नाहीत.त्यांनतर सारडा याने उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच शिंगटे यांनी शुक्रवारी सातारा तालुका पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवली. यानुसार सारडावर फसवणुकीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. जी. जाधव करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!