पेरणीचे फायदेशीर तंत्रज्ञान ,होते उत्पादनात वाढ आणि वेळेची बचत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेती करण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल दिसून येतो आहे. शेतात आता पूर्वीप्रमाणे मानवी आणि जनावरांकडून केली जाणारी कामे ही यंत्रांकडून केली जातात. सध्या शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरणीची लगबग सुरु आहे. लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी निलेश घोटेकर यांनी एका नव्या तंत्रानुसार एका एकर मध्ये कांद्याची पेरणीचे केली आहे. या तंत्रज्ञानामुळे केवळ कांदाच नाही तर कोथिंबीर, मेथी, गाजर अशा पिकांची देखील पेरणी करता येते.

या नविन तंत्रात कांद्यामध्ये पाच इंचाचे अंतर असते त्याचप्रमाणे निलेशने रेन पाईप चा वापर केला आहे. त्यामुळे पाणी भरणे व सर्वात महत्त्वाचे या दिवसात धूक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. सकाळी पिकांवर दवबिंदू साठतात कोवळ्या उन्हामुळे त्या कांद्याचे शेंडे करपतात. रेन पाईप चा उपयोग सकाळी सुरू केल्यानंतर त्या पाण्यामुळे दवबिंदू तळाशी जातात व शेंडे करपण्याचे प्रमाण कमी होते. सहाजिकच ज्या ठिकाणी औषधाचे चार स्प्रे करावे लागतात ते दोन वेळेस केले तरी चालते. औषधाचा व लागवडीचा खर्च कमी होतो व कांदे ही कमी कालावधीत तयार होतात.

शेतीसाठी मजुरांच्या उपलब्धीचा प्रश्न

कांद्याची प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी आगोदर बियाणाच्या माध्यमातून रोप तयार करावे लागते.त्यावर वातावरणाचा परिणाम होऊन रोगराईचा धोका निर्माण होतो. आणि यामध्ये नुकसान झाले तर शेतकऱ्यांना किलोमागे 2 हजार 500 रुपयांचे नुकसान होते. शिवाय दोन महिने त्या कांद्याच्या रोपाची जोपासना करावी लागते. मात्र, पेरणी पध्दतीने थेट कांदा पिकावरच शेतकऱ्यांना लक्ष केंद्रीत करता येते. लागवडीसाठी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही केवळ मजुरांअभावी कांद्याची लागवड रखडलेली आहे. त्यामुळे कमी वेळेत कांद्याच्या उत्पादनासाठी पेरणीयंत्रच महत्वाचे आहे.

नवीन तंत्रात एक एकरात पेरणी करण्यासाठी कांद्याचे साधारण दोन किलो बी लागते आणि पेरणीनंतर सव्वा चार महिन्यात पीक तयार होते. एरवी दोन महिने रोपासाठी व नंतर लागवड त्यामुळे सहा महिन्याचा कालावधी कांद्यासाठी लागतो आणि त्या लागवडीसाठी साधारणता बारा हजार रुपये खर्च येतो.या नवीन तंत्रानुसार पेरणीमुळे सव्वा चार महिन्यात कांद्याचे पीक हातात येते व लागवड खर्च लागवड कमी होतो. स्वतः निलेशने कांदा पेरणी यंत्र घेतले असून त्या पेरणी यंत्राने कांदे, कोथिंबीर, मेथी, गाजर हे पीक सुद्धा पेरले आहेत.

संदर्भ : टीव्ही ९

 

Leave a Comment

error: Content is protected !!