Bill Gates : जगात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या बिल गेट्सने तब्बल 2 लाख एकर शेतजमिन का विकत घेतलीय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्ही यापूर्वी ५० एकर शेती असणार्‍यांविषयी ऐकंल असेल. (Bill Gates Farm) काहींनी १०० किंवा खूपतर ५०० एकर जमिन असणारा शेतकरी पाहिला असेल. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकर्‍याबद्दल सांगणार आहोत ज्याच्या नावावर तब्बल 2 लाख 69 हजार एकर एवढी शेतजमिन आहे. होय हे खरं आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नाव असणार्‍या बिल गेट्स यांची अमेरिकेत एकुण 2 लाख एकरहून अधिक शेतजमिन आहे. अन् मुख्य म्हणजे ही सर्व शेतजमिन लागवडीखाली आहे. पडीक नाही.

खिशात, बँकेत पैसा मावेना म्हणुनच बिल गेट्सने शेतीत गुंतवणुक केलेली दिसतेय असा विचार तुम्ही करत असाल तर जरा थांबा.

शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती बघता महागाई, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे घसरलेले भाव, भरपूर कष्ट आणि त्या तुलनेत कमी मिळणारा नफा यामुळे शेतकरी वर्ग त्रासला आहे. भांगलन/खुरपणी करायला जेवढे पैसे जातात तेवढेपण कधी कधी शेतीतून मिळत नसल्यानं अनेकजण शेत विकून दुसरं काहीतरी करण्याकडे वळत आहेत. मग अशा या वातावरणात बिल गेट्सने इतकी शेती का बरं विकत घेतलीय? खिशात, बँकेत पैसा मावेना म्हणुनच बिल गेट्सने शेतीत गुंतवणुक केलेली दिसतेय असा विचार तुम्ही करत असाल तर जरा थांबा. कारण हे प्रकरण जरा वेगळंय.

हे तंत्रज्ञान वापरून हायटेक शेतीतून शेतीमधील उत्पन्न करा दुप्पट

शेतकरी मित्रांनो आता शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे खूप गरजेचे आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप वापरून १ लाख शेतकरी सध्या हायटेक शेती करून अधिक नफा कमवत आहेत. तुम्हीही या शेती उपयोगी मोबाईल अँप च्या मदतीने प्रगतशील शेतकरी बनून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोन देऊन मोठा नफा कमावू शकता. आजच तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला रोज कृषी तज्ज्ञांचा मोफत सल्ला मिळतो. तसेच तुमच्या जवळील सर्व खात दुकानदारांशी तुम्ही या अँपच्या मदतीने संपर्क करून खाते Online मागवू शकता. शिवाय तुमचा शेतमाल अँपवर विक्रीसाठी पोस्ट करून थेट बांधावर शेतमालाची विक्री करू शकता. यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज इथे दिला जातो. तेव्हा आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून या सेवेचा लाभ घ्या.

बिल गेट्स यांनी 2 लाख 69 हजार एकर शेती का विकत घेतली?

बिल गेट्स हे मुळात व्यावसायीक आहेत. शेती घेतानाही त्यांनी व्यावसायिक दृष्टीकोणातूनच घेतल्याचं एका मुलाखतीत सांगितलं आहे. शेती हे शाश्वत उत्पन्नाचं साधन आहे असं बिल गेट्स मानतात. माणुस एकवेळ सेर्व गोष्टी करण्याचं सोडू शकतो पण जेवण करण ही माणसाची गरज कधीच संपू शकत नाही हे गणित ध्यानात घेऊन बिल गेट्स शेतीत आले आहेत. सध्या अमेरिकेतील सर्व मेकडोनाल्ड स्टोअर्सना बिल गेट्स यांच्या शेतात पिकलेले बटाटे जातात. शेतीचं योग्य आर्थिक नियोजन केलं अन् मार्केटींगची कला शिकली तर शेतीत नक्कीच फायदा आहे असं गेट्स मानतात. अन् यामुळेच गेट्स यांनी अमेरिकेत तब्बल 2 लाख 69 हजार एकर एवढी शेतजमिन विकत घेतली आहे.

bill gates

बिल गेट्स शेतीकडं कसे वळाले?

बिल गेट्स हे काही छोेटे मोठे व्यक्ती नाहीत. मायक्रोसोफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे ते मालक आहेत. जगातील सर्वात श्रीमंत यादीत ते प्रथम क्रमांकाला आहेत. आयटी, विज्ञान तंत्रज्ञान अशा क्षेत्रात अव्वल कामगिरी करत असणारा हा माणूस शेतीकडं कसा काय बरं ओळला असेल असा प्रश्न पडणं साहजिक आहे. गेट्स यांनी काही वर्षांपूर्वीच मायक्रोसोफ्ट मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यानंतर ते गेट्स फाऊंडेशनसोबत पुर्णवेळ काम करत आहेत. हे करत असताना त्यांनी अनेक ठिकाणी आपली गुंतवणुक केली आहे. ही गुंतवणुक करत असतानाच बिल गेट्स यांच्या गुंतवणुक सल्लागार टीमने त्याना शेतीमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला. शेतजमिनीमध्ये मोठी गुंतवणुक करुन कशाप्रकारे व्यापार केला जाऊ शकतो हे जेव्हा गेट्स यांना पटवून सांगण्यात आले तेव्हा त्यांना ही कल्पना आवडली अन् काही काळातच त्यांनी हळू हळू करत तब्बल 2 लाख 69 हजार एकर शेतजमिन विकत घेतली.

बिल गेट्स यांची शेती कुठे आहे अन ते तिथे काय उत्पादन घेतात?

बिल गेट्स यांची २ लाख ६९ हजार शेतजमीन अमेरिकेत आहे. मागील १० वर्षांच्या कालावधीत गेट्स यांनी टप्याटप्प्याने ही शेतजमीन खरेदी केली आहे. अमेरिकेतील एकूण १८ राज्यांमध्ये गेट्स यांची जमीन आहे. असे म्हटले जाते कि गेट्स यांची शेती अंतराळातूनही दिसते. वॉशिंग्टनमध्ये, गेट्स यांच्या नावावर 14,000 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. यामध्ये ते प्रामुख्याने बटाट्याची लागवड करतात. अमेरिकेतील मॅकडोनाल्डसाठी फ्रेंच फ्राईज बनवण्याकरता लागणारे बटाटे हे गेट्स यांच्या शेतातून जातात. तसेच ते किराणा दुकानात बटाट्यांव्यतिरिक्त गाजर आणि कांदेही यांचाही मोठ्या प्रमाणात पुरवठा करतात.

लँड रिपोर्ट आणि NBC अहवालानुसार, गेट्स यांची उत्तर लुईझियानामध्ये 70,000 एकर जमीन आहे. तिथे ते कॉर्न, कापूस आणि तांदूळ पिकवतात. नेब्रास्कामध्ये 20,000 एकर आहे जिथे सोयाबीन पिकवतात. याव्यतिरिक्त, गेट्स यांच्याकडे जॉर्जियामध्ये 6000 एकर जमीन आहे. यातील काही जमिनींवर शहरं वसवण्याचंही गेट्स यांचं नियोजन आहे.

शेतकरी मित्रानो , बिल गेट्स हे श्रीमंत व्यक्ती असले तरी शेती घेण्यामागचे त्यांचे म्हणणे हे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासारखे आहे. विशेषतः जे शेतकरी आपली शेती विकू इच्छितात त्यांच्यासाठी…

शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे शाश्वत उत्पन्न

यासंदर्भात माहिती देताना बिल गेट्स यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात शेत जमिनीची खरेदी इन्व्हेस्टमेंट म्हणून केली आहे. त्याचा हवामान बदलाशी काहीही संबंध नाही. मी शेतीकडे बिजनेस म्हणूनच पाहतो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरेदी केली आहे. शेतीबरोबरच काही जमिनीवर स्मार्ट सिटी बनवण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे अर्थतज्ज्ञांच्या मते बिल गेट्स यांनी शेल कंपन्या तयार करून या जमिनी विकत घेतल्या तसंच जमिनीतून आर्थिक परतावा मिळत असल्याने बिल गेट्स यांनी हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेतील अर्थ तज्ञांचे मत आहे. तर शेतीतून मिळणारे उत्पन्न हे शाश्वत उत्पन्न असल्याचे बिल गेट्स सांगतात

शेतीला द्या व्यवसायाचे रूप

अमेरिकेतल्या लुसियाना प्रांतांमध्ये बिल गेट्स यांची 70 हजार एकर शेत जमीन असून तिथं सोयाबीन, कापूस आणि तांदळाचे पीक घेतली जातात , नेब्रास्का प्रांतात वीस हजार एकर, वॉशिंग्टनमध्ये 14 हजार एकर त्यांची जमीन आहे. एवढेच काय तर मॅकडॉनल्ड्स मध्ये मिळणारे फ्रेंच प्राईस हे बिल गेट्स यांच्या शेतातून येणार्‍या बटाट्या पासूनच बनविण्यात येतात. वॉशिंग्टन मधले शेत तर अंतराळातून दिसत असल्याचा दावाही केला जातो. ज्याप्रमाणे बिल गेट्स यांच्या दूरदृष्टीनुसार शेती हे शाश्वत उत्पन्न असल्यास केवळ शेती मधून उत्पादन न घेता त्यावरच प्रक्रिया करून स्वतःचा व्यवसाय उभारणे तो विकसित करणे हा उद्देश महत्वाचा आहे. त्यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या व्यक्तीला शेतीच उत्पन्नाचे प्रमुख साधन वाटतं असेल तर शेतकरी मित्रानो आपल्याकडे असलेल्या जमिनींचे देखील सोने होऊ शकते. फक्त गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची.

Leave a Comment

error: Content is protected !!