बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी करताय ? मग ही महत्वाची माहिती एकदा वाचाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी असण्याबरोबरच तुम्ही उत्तम पशुपालक होण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही आधी उत्तम जनावरांची निवड केली पाहिजे.  बाजारातून जनावरे विकत घेत असताना अनेक महत्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. उपलब्ध परिस्थितीत दुधाळ जनावराची कोणती जात नफा देऊ शकेल अशी जात निवडावी. जर फक्त दूध उत्पादन हाय पशुपालकाचे हेतू असेल तर म्हैस पालन करणे कधीही उत्तम ठरते. या लेखात आपण दुधाळ जनावरांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊ.

दुधाळ जनावरांची निवड कशी करावी?

–जनावराचा पाठीचा कणा वाकलेला असू नये.
–जनावरांची पहिली बरगडी दिसते स्वाभाविक असले तरी तिसरा बरगडी पर्यंत दिसणारी जनावरे अशक्त या प्रकारात मोडतात.
–गाईच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा. उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी.
–कास आणि सडाची तपासणी करावी. कासेची खोली मापक व क्षमता पुरेशी असावी. सड काशेच्या प्रत्येक चतुर्थांश प्रमाणबद्ध असावी. काटकोनात स्थित असावेत.
–मागील कास रुंद, उंच व घट्टपणे शरीराशी शी संलग्न असावी. किंचित वर्तुळाकार पद्धतीने मुळास जोडलेली असावी. कासेचे विभाजन पुरेशा प्रमाणात संतुलित असावे.
–पुढची कास घट्टपणे संलग्न असून त्याची लांबी मध्यम आणि क्षमता पुरेशी असावी. सड दंडगोलाकार, एकसमान आकाराचे व मध्यम लांबी आणि व्यास असावा.
–कासेस चार व्यतिरिक्त अधिक सड असू नये. सडातून हृदयाकडे जाणारी रक्तवाहिनी प्रशस्त व फुगीर असावे.
–जनावरांच्या दाताचे पाहणी करून वयाची खात्री करता येते. या वयातील जनावरे चार दाती असतात.
–जनावरांमध्ये गर्भपाताच्या घटनेचे प्रमाण तसेच कासदाह आजाराचा प्रादुर्भाव कधी झाला होता का याची माहिती घ्यावी.
–चारही सड पिळून पाणी उत्तम यामुळे सडनलिका बंद नाही याची खात्री होते.

जनावरे आजारी असतील तर त्याची लक्षणे कोणती

–अनेक आजारांचे जनावरांच्या बाह्य लक्षणांवरून निदान केले जाऊ शकते जसे की डोळ्यांतून आठवा नाकातून स्राव येणे हे जनावर आजारी असल्याचे लक्षण आहे.
–तसेच योनी मार्ग अथवा गुद्दारातून रक्त किंवा अस्वाभाविक स्राव येणे योनीचे आजाराचे लक्षण आहे.
–आजारी जनावर सुस्त, मलुल व अशक्त झालेले असते. काही आजारात बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत.
–आजारापासून वाचण्यासाठी जनावरांची नियमित लसीकरण केले जाते का याची चौकशी करावी व तसेच पशु वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याचा आग्रह करावा.

गायींची निवड

–आपल्याकडे होल्स्टिन संक्रीत आणि जर्सी संकरित गाई दिसतात. होल्स्टिन गायीचे दुधाचे प्रमाण अधिक आहे. तर जर्सी संकरित गाईच्या दुधात स्निग्धांश अधिक असते.
–गरजेप्रमाणे जर्सी किंवा होल्स्टिन गाईची निवड करावी.
–संकरित गाई घेताना पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेता विदेशी रक्ताचे प्रमाण 62.50 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये.
–जर्सी संकरित गाई डोंगराळ भागात संगोपनासाठी चांगले आहेत तर होल्स्टिन संकरित गाईंचे संगोपन पठारी भागात करावे.

संदर्भ – कृषी जागरण

Leave a Comment

error: Content is protected !!