साताऱ्यात लाडक्या “राणी लक्ष्मी ” म्हशीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : असं म्हटलं जातं ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना जिवापाड जपतात पोटच्या मुलांप्रमाणे आपल्या जनावरांचे संगोपन करतात आजकाल आपण अनेक पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करताना पाहिले… असाच एक प्रसंग सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडलाय. धामणेर गावात पाळीव म्हशीच्या अनोखी वाढदिवसाची चर्चा जोरात रंगली आहे.

संतोष क्षीरसागर हे दरवर्षी १६ जानेवारीला आपल्या म्हशीचा वाढदिवस साजरा करतात म्हशीमुळे क्षीरसागर यांच्या घरात भरभराटी आल्याचे ते सांगतात त्यामुळे त्यांनी म्हशीचे नाव “राणी लक्ष्मी ” ठेवलेले आहे.आपल्या लाडक्या म्हशीचा ३१ वा वाढदिवस साजरा करताना मालकाचे डोळे अक्षरश: भरुन आले. संतोष क्षीरसागर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केलाय.संतोष क्षीरसागर यांच्या म्हशीच्या वाढदिवसाला तरुण युवकवर्ग,महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्याबरोबर गोठ्यासमोर रांगोळी काढून,म्हशीला ओवळून,शिंग वाजवून केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

त्यांनी या वाढदिवसानिमित्त कातकरी समाजाच्या मुलांना,ऊस तोडणी मजूराच्या मुलांना खाऊ वाटप केले. शेवटपर्यंत आईची सेवा केली जाते तशीच आपल्या पाळीव जनावरांची सेवा करत राहणार अशी भावना संतोष क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!