विदर्भात थंडी वाढणार तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका असे वातावरण नागरिकांना अनुभवयाला मिळत आहे. राज्यामध्ये पुढील दोन दिवस विदर्भात थंडी वाढणार असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही थंडी राहू शकते तर येत्या पाच दिवसात राज्यातला हवामान प्रामुख्यानं कोरडे राहण्याची दाट शक्यता असल्याचा हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

उत्तर भारतात थंडीचा प्रभाव कायम
राजधानी दिल्ली, हरियाणा, पंजाब यांसारख्या उत्तर भारतातील राज्यांबद्दल बोलायचे झाले तर सकाळी आणि संध्याकाळी हलक्या थंडीचा प्रभाव आहे, तर उत्तर प्रदेशच्या काही भागात हलक्या धुक्यासह थंडीची लाट आहे.याशिवाय देशातील काही राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी बर्फवृष्टीमुळे तापमानात घट नोंदवण्यात आली आहे.हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य प्रदेशात किमान तापमानात किंचित घट नोंदवली जाऊ शकते. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम आणि मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. याशिवाय पूर्व राजस्थान विभागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, यूपीच्या काही भागात गारपीट होऊ शकते.

आज नोंदवलेले राज्यातील किमान तापमान
आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान पुढील प्रमाणे : सांताक्रूझ 11.9 रत्नागिरी 19.5 डहाणू १७, बारामती तेरा, नागपूर 14.4, महाबळेश्वर 12.8, सातारा 16.7 ,पुणे 12.1, उस्मानाबाद 12.1, जळगाव 12.4, परभणी 14.1, नाशिक 11.3, कोल्हापूर 18.9 ,नांदेड 16.2, सांगली 19.4, सोलापूर 17.1 ,मालेगाव 12.8, माथेरान १७, जालना 12.7 आणि चिखलठाणा 12.6.

Leave a Comment

error: Content is protected !!