आज कोकण ,मध्यमहाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण मध्य महाराष्ट्राच्या आज (तारीख 11) रोजी वीज आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा तर विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून ही प्रणाली ओरिसा आणि आंध्र प्रदेशातील दाराकडे येण्याचे संकेत आहेत. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनार्‍यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या दोन्ही प्रणालींच्या दरम्यान पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास वेगात

दरम्यान मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे राजस्थानातून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसात मान्सून संपूर्ण उत्तर भारतातून परतला आहे. माघारीच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने मंगळवार दिनांक 12 पर्यंत मध्यप्रदेश झारखंड बिहार चा बहुतांश भाग गुजरात छत्तीसगड आणि आणखी काही भाग महाराष्ट्र ओरिसा पश्‍चिम बंगालच्या काही भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे.

आज या भागात पाऊस

आज कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता या भागात हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!