संध्याकाळनंतर धो..! धो..! राज्यातल्या काही भागात आजही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुण्यासह राज्यातील अनेक भागात काल संध्याकाळपासून पावसाने अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान पुढच्या ३-४ दिवस देखील असाच पाऊस राज्यातल्या काही भागात कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पिकांची ऐन काढणी सुरु असताना शेतकऱ्यांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काल सायंकाळनंतर पुणे ,सातारा , सांगली, कोल्हापूर भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

 

5 ऑक्टोबर

कोकण विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.आज जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, रत्नागिरी या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

6 ऑक्टोबर

कोकण विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

7 ऑक्टोबर

कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा विभागात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!