कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यात पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. तर ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज दिनांक 13 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानाचा पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली होती. मात्र गुरुवारपासून राज्यात अंशतः ढगाळ हवामान असल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी दिनांक 12 रोजी सकाळी निफाड येथे दहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसेच पुणे, जळगाव येथे तापमानाचा पारा बारा वर्षांच्या खाली असून उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे रत्नागिरी येथे उच्चांकी तापमान 35.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येताच निवळू लागले आहे. शुक्रवारी दिनांक 12 रोजी सकाळी ही प्रणाली उत्तर अंतर्गत कर्नाटक मध्ये होती. थायलंडच्या आखात वर चक्राकार वारे वाहत असून आज दिनांक 13 रोजी बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. पूर्व किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली तीव्र होण्याचे संकेत आहेत. आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान केरळ आणि ओडिसा इथं पाऊस झाला.

‘या’ भागाला यलो अलर्ट

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागात विजांसह पाऊस पडण्याचा इशारा तसेच यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!