28-29 डिसेंबरला राज्यातल्या ‘या’ भागात गडगडाटासह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : या वर्षी वारंवार बदलते हवामान अनुभवायास मिळत आहे. सध्या राज्याच्या तापमानात कमालीची चढ उतार होताना पाहायला मिळत आहे. राज्यात उद्या (२८) आणि परवा (२९) राज्यातल्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

या भागात पाऊस
हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD)पूर्व अफगाणिस्तान व लगतच्या पाकिस्तानवर. तेथून राजस्थानवरच्या हवेतील सिस्टिम मधून, द्रोणीय स्थिती विदर्भ पर्यंत कार्यरत आहे. त्याचा प्रभावामुळे 28-29 डिसेंबरला मराठवाडा, विदर्भात गडगडाटासह पाउस, काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

कुठे किती तापामान ?
उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील निफाड हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले तर नाशिक आणि जळगाव येथे 12 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा तेरा अंशांच्या पुढे गेला सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक 33. १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजच्या ताज्या माहितीनुसार पुण्यातील शिरूर येथे किमान ११ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

‘या’ भागाला यलो अलर्ट
दिनांक 28 रोजी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दिनांक 29 डिसेंबर रोजी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे

Leave a Comment

error: Content is protected !!