मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पाऊस काहीसा गायब झाला होता. आता गुरुवारपासून पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक ८ व ९ जुलै रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (३० ते ४० किलोमीटर प्रति तास) राहून पावसाची शक्यता आहे. विशेषतः जालना, परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

तसेच दिनांक १० जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात तर ११ जुलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तसेच १२ जुलै रोजी नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सौजन्य :
डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

Leave a Comment

error: Content is protected !!