राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिटीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस असं सत्र सुरू आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात राज्यामध्ये असंच काहीसं वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. १ ते २ मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवार पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. राज्यातील बीड, नंदुरबार आणि सातारा याठिकाणी मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच या भागात तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज मुंबईचा हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान रविवारी देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असलेल्याने शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिकांना सुरक्षित ठिकाणी ठेवा व काढणीला आलेल्या पिकांची लवकरात लवकर काढणी करावी असा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!