राज्यात पुढच्या 4,5 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासह, मुसळधार पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. आज तारीख 24 रोजी कोकण विदर्भात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून राजस्थानच्या जैसलमेर पासून चित्तोडगड, तिकामगड, अंबिकापूर, पुरी ते बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रीय आहे. पश्चिम राजस्थान आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तेलंगणा परिसरावरही नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

झारखंड परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. यातच म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती मुळे पूर्व मध्य बंगाल उपसागरात आज दिनांक 24 रोजी सायंकाळपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून ते ओरिसाच्या किनाऱ्यावर येणार याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी उद्या दिनांक 24 रोजी कोकण, पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भासह मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान कोकणात रायगड रत्नागिरी विदर्भातील अकोला वाशीम यवतमाळ इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा अमरावती वर्धा इथं विजा आणि मेघगर्जनेसह व पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.24सप्टेंबर संध्याकाळी पर्यंत एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता व 48 तासात प-़उ/प दिशेने प्रवास ओडीशा किनारपट्टी कडे. त्याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढच्या 4,5 दिवसात काही ठिकाणी गडगडाटासहीत व काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!