रासायनिक खते आणि बियाण्यांच्या दरवाढीचा फटका, कृषी सेवा केंद्र पडली ओस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सध्या तिहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. एकीकडं अवकाळी दुसरीकडं लॉकडाऊन आणि आता तिसरी बाब म्हणजे खतांच्या किमती मध्ये झालेली दुपटीने वाढ. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतकऱ्याला आता पेरणीचे वेध लागले आहेत. मे महिना लागताच शेतकरी कृषी केंद्रांवर बी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र या वर्षी बी बियाणे खते यांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाल्याने शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.

भंडारा जिल्ह्यातील कृषी केंद्र ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. अवकाळी पाऊस गारा पडल्याने धानाचे होणारे नुकसान अशा अनेक समस्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसत आहे शेतीची मशागत लागवड बी-बियाणं पुरवणी पासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावे लागतात. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रति तासाचे मशागतीचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्यादरातही वाढ झाली आहे.

आता पुन्हा शेतकऱ्यांपुढे नवीन संकट आले आहे. खतं बी-बियाणं याच्या किमती मध्ये दुप्पट वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे शेती कशी करावी असा प्रश्न पडला आहे. खतांच्या किमती वाढण्याचा फटका शेतकऱ्यांच्या सोबतच कृषी केंद्र चालकांना सुद्धा बसला आहे. दरवर्षी मे महिना सुरू होताच कृषी केंद्रांवर बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असते मात्र आता संपूर्ण केंद्र रिकामे दिसत आहे असं कृषी केंद्र चालक सांगत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!