मिरची लागवड माहीती भाग 2 – पिकातील प्रमुख रोग ,किड व उपाय, संपूर्ण व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वयंपाक घरातील माळव्यामध्ये हमखास दिसणारी मिरची शेतकऱ्यांना बारमाही उत्पन्नाची हमी देते. अनेक शेतकरी मिरची पिकातून भरघोस उत्पादन घेतात . परंतु रोग ,किडींमुळे व चुकिच्या जमिनिच्या निवडीमुळे मिरची पिक हातून जावू शकते . मिरची पिकांसंबंधी भाग 1 नंतर भाग 2 मिरची पिकाची लागवड करण्याच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना हि माहीती उपयुक्त ठरणार आहे .

मिरची पिकाच्या शेताची पूर्वमशागत

एप्रिल मे महिन्यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे .

लागवड

उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्याा जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्दततीवर लागवड करावी. रोपे गादीवाफ्यातून काढल्याडनंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्यालत 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 80 टक्के मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावे.

खते आणि पाणी व्यवस्थापन

वेळेवर वरखते दिल्या्मुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र 50 किलो स्फूरद आणि ओलिताच्या पिकासाठी दर हेक्ट‍री 100 किलो नत्र 50 किलो स्फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्याश वेळी द्यावी. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्याा लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्दतीने द्यावी.

मिरची बागायती पिकाला जमिनीच्याव मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी द्यावे. त्यालनंतर 5 दिवसांच्या किंवा एक आठवडयाच्याा अंतराने पाणी द्यावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्याच अंतराने तर
उन्हाळ्यात 6 ते 8 दिवसांच्यात अंतराने पिकाला पाणी द्यावे.

आंतरमशागत

मिरचीच्या रोपांच्या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्यायनंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना मातीची भर द्यावी. बागायती पिकांच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर 2 महिन्यां नी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.

रोग आणि किड

रोग

1) मर

हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यायमुळे रोप कोलमडते.

उपाय

10 लिटर पाण्याळत 30 ग्रॅम कॉपरऑक्झीक्लोराईड 50 टक्के मिसळून हेक्टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्या: मुळा भोवती ओतावे.

 

2) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे( फ्रूट रॉट अँन्ड डायबॅक )

हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्याढ फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.

उपाय

या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा डायथेन एम 45 किंवा कॉपर ऑक्सिक्लोतराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.

 

3) भुरी ( पावडरी मिल्डयू ) …

भूरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.

उपाय …

भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा 10 मिलीलिटर कॅराथेन 10 लिटर पाण्या त मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्यास अंतराने दोन फवारण्याख कराव्यात.

किड

1 ) फूलकिडे

हेक्टरी किटक आकाराने अतिशय लहान म्हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या‍ कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हेक्टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्याचमुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.

उपाय

रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्याी अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्यार मिसळून फवारावे.

2) मावा

हे किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेड्यांतील रस शोषण करतात. त्यानमुळे नविन पालवी येणे बंद होते.

उपाय

लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काढणी व उत्पादन

हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्या मिरच्यांची तोडणी देठासह 10 दिवसांच्या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरु झाल्या नंतर 3 महिने तोडे सुरू राहतात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्या मिरच्यांसाठी त्याे पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी.

जातीपरत्वे ( बागायती) हिरव्याल मिरच्यांचे हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते. वाळलेल्या लाल मिरच्यां चे उत्पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्पादन 6 ते 7 क्विंटल येते.

मिरची वरील मर रोग आणि उपाय

मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्‍या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि कोमेजतात रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मरतात.

उपाय
मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!