वातावरणीय बदलाचा फटका, मराठवाडा ते विदर्भ उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदल, बाजारातील गडगडलेला भाव यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आलेला आहे. राज्यात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा २-३ रुपये मिळाल्यामुळे वैतागून टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याची घटना ताजी असताना विदर्भात देखील उडीद पिकाची अवस्था काही वेगळी नाही. वातावरणातील बदलामुळे उडीद पिकाचे नुकसान झाल्यामुळे मराठवाडा विदर्भात शेतकऱ्याने उडीद पिकावर रोटाव्हेटर फिरवल्याची घटना समोर आली आहे.

अज्ञात रोगामुळे उडीद पीक हातून गेलं

ऐन फुलोरा अवस्थेत असलेले उडीद पीक वातावरणातील बदलांमुळे पीक हातून गेले आहे. खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उडीद पीक ट्रॅक्टर द्वारे नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले असून लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अकोला जिल्हातल्या सांगळूद गावामध्ये उडदाचे पीक हे चांगल्या प्रकारे आले होते. परंतु, वातावरणातील बदलामुळे संपूर्ण उडीदाचा फुलोरा निघून गेला असल्याने सांगळुद येथील अरुण तायडे या शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतावर ट्रॅक्टर फिरवून उडीद पीक नष्ट केले. वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.

उस्मानाबादमध्येही चार हेक्टरवर रोटावेटर

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील पावसाने मोठ्या प्रमाणावर विश्रांती घेतल्याने उडीद पिकांना मोठा फटका बसला. एका शेतकऱ्यानं चार हेक्टर उडीद पिकात चक्क रोटाव्हेटर फिरवून मोडीत काढले आहे. आहे त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावे लागले आहे. उत्पन्नापेक्षा खर्चाचा हिशोब दुप्पट दिसत असल्याने जेवळी येथील वैतागलेला शेतकरी कल्याणी संभाजी घोडके या शेतकऱ्यांने आपल्या दहा एकर क्षेत्रावर असलेल्या उडीद पीकात चक्क रोटाव्हेटर मारुन मोडीत काढला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!