हवामानात बदल ; लिंबूवर्गीय पिकांत कोळी, हरभऱ्यावर घाटी आळी तर उसावर खोड किडींचे आक्रमण ,असे करा उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियस ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, व त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पूढील तीन दिवसात किमान तापमानात व कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सियस ने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, व त्यानंतर चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

हरभरा : उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी करून 80 ते 85 दिवस झाले असल्यास) पिकास पाणी द्यावे.

गहू : गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उन्हाळी सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडी (पांढरी माशी व तूडतूडे) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावेत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त दिसून आल्यास थायामिथॉक्झाम 12.6% + लॅबडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी 2.5 मिली किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उन्हाळी सोयाबीन : उन्हाळी सोयाबीन पिकाची पेरणी करून 20 ते 25 दिवस झाले असल्यास व पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास मायक्रोला आरसीएफ (ग्रेड-2) या सूक्ष्म अन्नद्रव्याची 50 ते 75 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ऊस : हंगामी ऊस पिकाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% ईसी 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद : हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. डाळींब बागेत शॉर्ट होल बोरर/खोड किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास खोडांना लेप लावण्यासाठी लाल माती 4 किलो + क्लोरपायरीफॉस 20% ईसी 20 मिली + कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून जमिनीपासून 2 ते 2.5 फुट खोडावर लेप लावावा. थाईमेथॉक्झाम 25% डब्ल्यूजी 10 ते 15 ग्रॅम + प्रोपीकोनॅझोल 25% ईसी 15 ते 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून ड्रेनचींग करावी.

भाजीपाला

मिरची पिकावरील फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन 30% ईयी 3.5 मिली किंवा स्पिनोसॅड 45% एसएल 3.2 मिली किंवा फिप्रोनिल 5% एससी 20 मिली किंवा ॲसिटामाप्रीड 7.7% एससी 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी गादी वाफ्यावर मिरची, कांदे, टोमॅटो इत्यादी पिकांची रोपे तयार करावीत.

फुलशेती

गॅलार्डिया फुल पिकाची लागवड करावी. फुल पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम उद्योग

तुती पाने उत्पादन वाढीसाठी व प्रकाशाचा पुरेपुर वापर होण्यासाठी विपूल (गोदरेज) 20 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून छाटए नंतर 12 ते 15 दिवसांनी तुती बागेवर फवारणी करावी त्यामूळे पानांचे 20 टक्के उत्पादन वाढ मिळते. पानावर ठिपके किंवा करपा रोग किंवा भुरी रोग प्रादूर्भाव असेल तर सोबत बाव्हेस्टीन बुरशीनाशक (कार्बेन्डाझीम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसऱ्या वर्षापासून व्हि-1 जातीचे एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळते.

Leave a Comment

error: Content is protected !!