राज्यात ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस; कसे कराल फळबागा आणि पालेभाज्यांचे व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा राहण्याची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी -बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. केळी बागेत रोगनाशकाची आळवणी करावी.

द्राक्ष – बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. सिताफळ बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला

सध्या ढगाळ वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी.

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी भाजीपाला पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात 1 टक्का 13:00:45 ची पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी.

Leave a Comment

error: Content is protected !!