राज्यात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाची हजेरी ; तूर, हरभरा ,गहू पिकांना फटका बसण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि काही भागात विजांसह पावसाने देखील हजेरी लावली आहे. इथून पुढे तीन दिवस राज्यात अशाच प्रकारचे वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान तज्ञ् के एस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार दिनांक 19-20 नोव्हेम्बर या काळात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. तर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भागात पाऊस हजेरी लावेल.

थंडी गायब

पुणे शहर आणि परिसरातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात होणाऱ्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या किमान तापमानात ही वाढ दिसून येत आहे. परिणामी पुणे शहरात उकाडा काही प्रमाणात वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुणे शहर आणि आसपासच्या भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. कोकणात अवकाळी पावसानं हवामानात मोठा बदल झालेला पहायला मिळतोय. नोव्हेंबर महिन्यातील गुलाबी थंडी गायब झालीये आणि कोकणात सध्या विचित्र हवामान पहायला मिळतंय. सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी कडकडीत उन आणि पुन्हा सायंकाळी पाऊस असं काहीसं विचित्र वातावरण कोकणात पहायला मिळतंय. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. पण, सध्या कोकणवासीय विचित्र हवामानाचा सामना करताना पहायला मिळताय.

ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका

नांदेडमध्ये गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, त्यात अधून मधून रिमझिम पावसाची देखील बरसात होतेय. अवेळी पडणाऱ्या या पावसाने आणि सूर्यदर्शन होत नसल्याने रब्बीचा हंगाम धोक्यात आलाय. या विचित्र हवामानाला तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाला चांगलाच फटका बसतोय. तर, हवामान बदलातील या घटकामुळे मलेरिया डेंग्यूसह साथ रोग आजार बळावण्याची भीती आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!