राज्यात उकाडा आणखी वाढणार, आठवडाभर ढगाळ वातावरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात दिवसभर ऊन आणि संध्याकाळ नंतर ढगाळ हवामान अशा परिस्थितीचा अनुभव नागरिक घेताना दिसत आहेत. ढगाळ हवामान आणखी काही दिवस असेच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशतः किंवा सामान्यतः ढगाळ स्थिती राहील असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

याच बरोबर या कालावधीत दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिणे पासून मध्यप्रदेशच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचे प्रमाण हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचं सावट आहे. गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. काही ठिकाणी गारपीटही झाली होती. राज्यात पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाचं सावट आणखीन आठवडाभर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आतापासूनच वैशाख वणव्याचे चटके बसू लागले आहेत. दोन दिवसात मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. पुढील आठवड्यात तापमान 36 अंशच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे. तर कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून 9 मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मात्र 9 मे पर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्‍या पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!