मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ; कसा कराल ऑनलाईन अर्ज ? ९५%मिळते अनुदान, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे.ही योजना अटल सौर कृषी पंप योजना या नावानेही ओळखली जाते.

–महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 अंतर्गत राज्य सरकार राज्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेती सिंचनासाठी सौर पंप पुरवण्यात येतो.
–सौर पंप योजनेंतर्गत राज्य सरकार पंप खर्चाच्या 95% अनुदान देते.
–शेतकर्‍यांना फक्त 5% रक्कम भरावी लागते.
–महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना २०२१ च्या माध्यमातून सौर पंप मिळवून शेतकर्‍यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल आणि त्यांना बाजारपेठेतून जास्त किमतीचे पंप खरेदी करावा लागणार नाही. या सौर पंपांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाचे प्रदूषण देखील होणार नाही. या योअंजनेकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
–3 एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या सर्व शेतकर्‍यांना 3 एचपी पंप आणि 5 एकर पेक्षा जास्त शेती असेल तर त्या शेतकर्‍यांना 5 एचपी चे पंप मिळतील.
–ज्या शेतकर्‍यांकडे आधी पासूनच वीज जोडणी आहे, त्यांना या योजनेंतर्गत सौरऊर्जेवर चालणार्‍या  पंपचा लाभ दिला जाणार नाही.

किती मिळते अनुदान

विभाग                            3 HP पंप                                5 HP पंप

ओपन कॅटेगरी साठी        25500=00 (10%)               38500=00 (10%)
अनुसूचीत जातींसाठी       12750=00 (5%)               19250=00 (5%)
अनुसूचीत जमातींसाठी     12750=00 (5%)             19250=00 (5%)

पात्रता

–अटल सोलर पंप योजना 2021 चा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे विहीर असणे आवश्यक आहे तसेच ज्या शेतकर्‍यांच्या शेतात आधी पासूनच वीज उपलब्ध आहे अश्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
–परिसरातील शेतकरी जे पारंपारिक उर्जा स्त्रोत (उदा. महावितरणद्वारे) विद्युतीकरण करीत नाहीत.
–दुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी
–वनविभागातील एनओसीमुळे अद्याप खेड्यांमधील शेतकरी विद्युतीकरण झाले नाहीत.
–ए.जी.पंपसाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करणार्‍या अर्जदारांची प्रलंबित यादी.
–निवडक लाभार्थ्यांच्या क्षेत्रात 5 एकर 3 एचपी डीसी आणि 5 एकर 5 एचपी डीसी पंपिंग सिस्टम तैनात करण्यात येते .
–जल स्त्रोत म्हणजे नद्या, नाले, स्वत: ची आणि सामान्य शेती तलाव आणि खोदलेले विहीर इ.

आवश्यक कागदपत्रे

–अर्जदाराचे आधार कार्ड
–ओळखपत्र
–पत्ता पुरावा
–शेती कागदपत्रे (सातबारा आणि 8 अ )
–बँक खाते पासबुक
–मोबाइल नंबर
–पासपोर्ट आकाराचा फोटो

कसा कराल ऑनलाईन अर्ज

–सर्वात आधी तुम्हाला MAHA DISCOM SOLAR PUMP YOJANA च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
–वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ ओपन होईल.
–मुखपृष्ठावर तुम्हाला Beneficiary Services च्या ऑप्शन वरती क्लिक करावे लागेल.
— नंतर समोरचे पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला New Comsumer या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
–पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर MUKHYAMANTRI SOLAR PUMP YOJANA 2021 APPLICATION FORM ओपन होईल.
–या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अगदी काळजीपूर्वक भरावी लागेल आणि नंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.
वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

कसा तपासाल अर्जाचा स्टेट्स ?

–MAHA DISCOM SOLAR PUMP YOJANA 2021 साठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थिति तपासावी लागेल म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज स्वीकृत झाला की नाकारला गेला.
–सर्वात आधी तुम्हाला मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2021 च्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर योजनेचे मुखपृष्ठ ओपन होईल.
–मुखपृष्ठावर तुमच्या समोर Beneficiary Services चा ऑप्शन असेल तुम्हाला त्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल नंतर पुढचे पृष्ठ तुमच्या समोर उघडेल त्या पृष्ठावर Track Application Status असा पर्याय असेल तुम्हाला या वर क्लिक करावे लागेल.
–पुढील पेज वर तुम्हाला तुमचा अॅप्लिकेशन नंबर टाकून सर्च बटन वर क्लिक करावे लागेल. नंतर तुमच्या समोर तुम्ही भरलेल्या अर्जाची स्थिति उघडेल.
अश्या प्रकारे वरील प्रमाणे तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2021 च्या अर्जाची स्थिति तपासू शकता

Leave a Comment

error: Content is protected !!