राज्यात थंडी आणि ऊन संगटच…! सिंधुदुर्गात मात्र पावसाची हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अंशतः ढगाळ हवामान असलं तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी आता कमी झाली आहे. आज दिनांक 18 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान सोमवारी कोकनातील काही भाग आणि गोवा राज्यात पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावल्याची माहिती हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

सोमवारी दिनांक 17 रोजी उत्तर प्रदेशातील फुरसतगंज येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अनेक भागात दिवसाही गारठा वाढला असून मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली ,उत्तर प्रदेश, राजस्थान ,बिहार या राज्यांमध्ये आज थंड दिवस अनुभवायला मिळणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाली असून धुके देखील कायम आहे. यातच दुपारच्या वेळी राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान होत असून राज्यात कमाल तापमानाचा पारा ही वर जाऊ लागला आहे. सोमवारी दिनांक १७ रोजी जिल्ह्यात अंशतः ढगाळ हवामान होतं. धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरीत उच्चांकी 32.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापूर आणि सांताक्रुज येथेही तापमानाचा पारा ३० अंशावर गेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!