राज्यात एकीकडे थंडी तर दुसरीकडे मेघगर्जनेसह पाऊस ; पहा आजचा हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रावर ही जाणवतो आहे. मागील काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी दिनांक 12 रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालय इथं नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. तर आज दिनांक 13 रोजी राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असून विदर्भात मात्र विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच

विदर्भात अवकाळी पाऊस सुरूच असून बुधवारी दिनांक 12 रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये गडचिरोली, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. गडचिरोलीतील भामरागड येथे ६० मिलिमीटर आहेर 40, एटापल्ली, मुलचेरा 30, गडचिरोली धानोरा प्रत्येकी 20, नागपुर मधील पार्शिवणि नागपूर, रामटेक प्रत्येकी ३०, कामठी, हिंगणा प्रत्येकी 20 आणि गोंदिया येथे 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. आज आणि उद्या देखील या भागात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान तज्ञ केस होसाळीकर यांनी दिली आहे.

13– आज गुरुवार दिनांक 13 रोजी नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा आणि गडचिरोली या भागांमध्ये विजयांसह पावसाची शक्‍यता असून या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

14- उद्या शुक्रवार दिनांक 14 रोजी नागपूर, वर्धा ,यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या भागात विधानसभा पावसाची शक्यता आहे या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राजस्थान मधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र देखील गारठला आहे . उत्तर महाराष्ट्र ,विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. अनेक ठिकाणी पहाटे दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. तसंच सकाळी नऊ वाजले तरी काही भागात सूर्यदर्शन होत नाहीये.

Leave a Comment

error: Content is protected !!