कृषी अभ्यासक्रमाच्या ४५ हजार विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत ; कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करणे देखील कठीण झाले आहे. अशातच कृषी अभ्यासक्रमाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक दिलासादायक बातमी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. कृषि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी, पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाचे विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत बुधवारी कुलगुरूंसमवेत बैठक झाली.कोरोना प्रादुर्भावामुळे कृषि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचा निर्णय घेतला. अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.

४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ

राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकुण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याचे आई-वडील, पालक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कातसुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुल्क थकीत असलेल्या परीक्षेचा अर्ज अडवला जाणार नाही

विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवु नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!