सोयाबीन पिकात शंखी गोगलगाय, क्लोरोसीस, खोडमाशी व उंटअळीचा प्रादूर्भाव? काय कराल उपाय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो , जुलै महिन्याच्या सुरवातीला पाऊस लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर कोवळी पिके देखील चांगली आली, मात्र मागच्या आठवाड्यापासून झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साठून राहिले आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. सोयाबीन पिकात विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? याची माहिती या लेखात घेऊया…

जास्त पाऊस झालेल्या भागातील सोयाबीन पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.

शंखी गोगलगाय

सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे.

सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस)

सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर 0.5 % (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) फेरस सल्फेटची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चेलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड (II) 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यास फवारणी करावी.

खोडमाशी व उंटअळी

सोयाबीन पिकात खोडमाशी व उंटअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम 12.6 + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.खोडमाशी व उंटअळी

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे,
मुख्य प्रकल्प समन्वयक,
ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Leave a Comment

error: Content is protected !!