कृषी विद्यापीठातील विद्यार्थी गटात वाद; हस्तक्षेपानंतर प्रकरण निवळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Table of Contents

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर

अहमदनगर मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे स्थानिक आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. हा वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी रविवारी पहाटे स्थानिक विद्यार्थ्यांकडून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

वादाचा व्हिडीओ व्हायरल

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी पहाटे अचानक वसतीगृहातील विद्यार्थ्यांवर येथील स्थानिक विद्यार्थ्यांनी दगडफेक करण्यास सुरवात केली. रविवारची पहाट असल्याने अंधारात वसतीगृहाच्या दिशेने दगडे भिरकावली जात होती. यामध्ये काही विद्यार्थी हे जखमी झाले पण ज्यांना या वादाबद्दल काहीच माहिती नव्हते ते मात्र, दबा धरुन बसले होते. वसतीगृहात अधिकृतपणे राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर नेमका कशाचा राग होता हे स्पष्ट झाले नसले तरी वादा दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. महात्मा फुले विद्यापीठात ही घटना घडली आहे.

वसतिगृह परिसरातील वातावरण तंग

वसतीगृहाच्या परिसरात वादाला सुरवात झाली होती. मात्र, सुरक्षा-रक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आतमध्ये आणले व मुख्य गेट हे बंद करुन घेतले. असे असतानाही स्थानिकच्या विद्यार्थ्यांनी मात्र, वसतीगृहाला गराडा घातला. एवढेच नाहीतर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर येण्याचे ते आव्हान देत होते. मात्र, सुरक्षा रक्षक आणि काही प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांची समजूत काढली वर प्रकरण अधिकचे चिघळले नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!