कृषी क्षेत्राच्या विकासासाठी इस्त्राईलशी सहकार्य करार, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत आणि इस्त्राईल या दोन्ही देशांमध्ये भारतातील शेती विकासासाठी १९९३ पासून सहकार्य केले जात आहे. आता त्यामध्ये आणखी भर पडणार आहे कारण इस्त्राईल आणि केंद्र सरकार यांच्यात तीन वर्षीय विकास कार्यक्रमाबाबत करार झाला आहे. भारत आणि इस्त्राईल यांच्यात तंत्रज्ञान आदान प्रदान करण्यासोबत उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.भारत आणि इस्त्राईल शेती आणि जलसंधारण क्षेत्रात काम करतील

या कार्यक्रमांचा असेल समावेश

–इस्त्राईलनं पुढील तीन वर्षांमध्ये शेती क्षेत्रातील सेंटर ऑफ एक्सलन्सची संख्या वाढवणे
— नवीन केंद्र स्थापन करणे, त्या केंद्रांना आत्मनिर्भर करण्यासाठी सहयोग देण्याचं ठरवलं आहे.
–इंडो-इस्त्राईल विलेजस ऑफ एक्सलन्स ही एक नवीन संख्या आहे.
— 8 राज्यांच्या 75 गावांमध्ये 13 केंद्र उभारण्या निर्णय घेण्यात आला आहे.
–यामुळे भारतातील पारंपारिक गावं आधुनिक शेती केंद्रात बदलली जातील.

याबाबत बोलताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हंटले की, इंडो-इस्त्राईल अ‌ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम हा पाचवा कार्यक्रम आहे. पहिला डेव्हलपमेंट पोग्राम 2008 मध्ये सुरु झाला होता. त्यांनतर आतापर्यंत चार प्रोग्राम पूर्ण झाल्याचं देखील त्यांनी सांगितले. इस्त्राईल तंत्रज्ञानावर आधारीत सुरु करण्यात आलेले सेंटर ऑफ एक्सलन्स ह यशस्वी ठरल्यांचं देखील त्यांनी सांगितले.

ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा

इस्त्राईलच्या सहकार्यांनं भारतामध्ये इंडो-इस्त्राईल एक्सलन्स प्रोग्राम राबवण्यात येत आहे. भारतात इस्त्राईलनं विकसित केलेल्या ड्रिप सिंचनामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. इस्त्राईलच्या सहकार्यानं भारतात 12 राज्यांमध्ये 29 सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यरत आहेत. यामधून भाज्या आणि फळ झाडांची निर्मिती केली जात आहे. फळबागा लावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाते. दरवर्षी किमान 1.2 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाते.

Leave a Comment

error: Content is protected !!